जळगाव जामोद, जि. बुलडाणा ः ‘‘या देशातील जल, जमीन आणि जंगलावर पहिला अधिकार हा आदिवासींचा अधिकार (Tribal Right) आहे. सध्याचे केंद्र सरकार आदिवासींना आदिवासी संबोधत नाही तर वनवासी म्हणते. वनवासी आणि आदिवासी या दोन शब्दांमध्ये फरक आहे,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले.
भारत जोडो यात्रेअंतर्गत त्यांनी रविवारी (ता.२०) बुलडाणा जिल्ह्यात भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आदिवासी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
गांधी म्हणाले, ‘‘या देशातील जंगल झपाट्याने नाश पावत आहे. पंतप्रधान ही जंगले नष्ट करून ती जागा उद्योगपतींना उद्योग उभारण्यासाठी देत आहेत. काँग्रेस आणि मी सदैव आदिवासींसाठी लढा देत राहू. लहानपणी आजी इंदिरा गांधींनी सांगितले होते की, आदिवासी हे देशाचे खरे मालक आहेत. आजींनी दिलेले पुस्तक वाचल्यानंतर मी आदिवासी संस्कृतीचा अभ्यास केला. आदिवासी या देशाचे खरे मालक आहेत. आदिवासींसाठी काँग्रेस पक्ष सदैव संघर्षरत आहे,’’ असेही ते म्हणाले.
यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित
भारत जोडो यात्रा महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर सध्या मुक्कामी आहे. राहुल गांधी गुजरातमध्ये दोन दिवस प्रचारासाठी गेल्याने ही यात्रा २३ नोव्हेंबरपासून पूर्ववत सुरू होऊन मध्य प्रदेशात दाखल होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.