APMC Election : सात बाजार समित्यांची अंतिम यादी २७ रोजी

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांकरिता अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
APMC Election
APMC ElectionAgrowon

APMC Election सांगली ः जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांकरिता (APMC Election) अंतिम मतदारयाद्या (Voter List) प्रसिद्ध केल्या आहेत. त्या बाजार समित्यांच्या अंतिम मतदारयाद्यांमध्ये सुधारणा करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने (Cooperative Election Authority) दिले आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील सांगलीसह, तासगाव, आटपाडी, विटा, पलूस, वाळवा आणि शिराळा बाजार समित्यांच्या मतदार यादीत सुधारणा करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत आणि विकास सोसायट्यांमध्ये नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश बाजार समित्यांच्या मतदारांमध्ये होणार आहे.

त्यानुसार २७ फेब्रुवारीला अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. त्या यादीवर हरकतींसाठी ८ मार्चपर्यंत मुदत आहे.

मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनामुळे बाजार समित्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. दीड वर्ष संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून जिल्ह्यातील सांगली, तासगाव, आटपाडी, विटा, पलूस, वाळवा आणि शिराळा बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त केले होते.

एप्रिलपूर्वी त्यांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश न्यायालयाने पणन संचालकांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांच्या निवडणुकीची मतदार यादी निश्चित करण्याचे आदेश सहकार प्राधिकरणकडून देण्यात आले आहेत.

APMC Election
APMC Election : बाजार समितीच्या मतदार यादीतून नावे वगळली

राज्यात १ सप्टेंबर २०२२ नंतर ९ हजार ५२५ ग्रामपंचायती व ११३२ प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नव्या सदस्यांची निवड झाली आहे.

ते निवडून आलेले सदस्य बाजार समितीच्या निवडणुकीस पात्र झाले असून, त्या पात्र सदस्यांचा समावेश होण्यासाठी मतदार याद्या सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीकरिता अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

APMC Election
APMC Election : बाजार समित्यांच्या निवडणुकांनाही आचारसंहिता

बाजार समित्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर २०२२ नंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करून अंतिम मतदारयादीत सुधारणा करण्याचा कालावधी १० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत निश्चित केला आहे.

सुधारित प्रारूप मतदार यादी २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्या यादीवरील आक्षेप, हरकती २७ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत मागविण्यात आल्या आहेत. आक्षेपांवरील निर्णय ८ मार्च ते १७ मार्चपर्यंत घ्यावेत.

तर, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी २० मार्चपर्यंत सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

बाजार समित्यांच्या अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम

अंतिम मतदारयादीत सुधारणा कालावधी ः १० ते २४ फेब्रुवारी

सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ः २७ फेब्रुवारी

मतदार यादीवरील हरकती ः २७ फेब्रुवारी ते ८ मार्च

हरकतींवर सुनावणी व निर्णय ः ८ ते १७ मार्च

सुधारित अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ः २० मार्च

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com