Maratha Andolan : मराठा आंदोलनाची धग वाढली

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शुक्रवारी (ता. १) मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे रविवारी (ता. ३) तिसऱ्या दिवशीही मराठवाड्यासह राज्यात विविध ठिकठिकाणी संतप्त पडसाद उमटणे सुरूच आहे.
Maratha Andolan
Maratha AndolanAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शुक्रवारी (ता. १) मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे रविवारी (ता. ३) तिसऱ्या दिवशीही मराठवाड्यासह राज्यात विविध ठिकठिकाणी संतप्त पडसाद उमटणे सुरूच आहे.

बंद, रास्ता रोको, ठिय्या आंदोलने असे तिसऱ्या दिवशीच्या आंदोलनाचे स्वरूप पाहायला मिळाले. दरम्यान आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरूच आहे. शिवाय राजकीय नेत्यांच्या भेटीही सुरूच होत्या.

आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्‍नी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले. त्यांच्या या उपोषणाला जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यांतील गोदावरी नदीकाठच्या जवळपास १३० गावांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान रविवारीही जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच होते. शासनाने आरक्षण जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका श्री. जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे.

Maratha Andolan
Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला, जालनासह बीड बंद

चौकशीत दोषी आढळल्यास निलंबन ः मुख्यमंत्री शिंदे

मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ला हा दुर्दैवी आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत दोषी आढळलेल्यांना निलंबित करू. जालना पोलिस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवत असून जालन्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा येथे (ता. ३) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात सांगितले.

जालन्याच्या एसपींना पाठवले सक्तीच्या रजेवर

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमारप्रकरणी राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाई करीत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले. त्यांच्या या उपोषणाला जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यांतील गोदावरी नदीकाठच्या जवळपास १३० गावांनी पाठिंबा दिला आहे.

दरम्यान रविवारीही श्री. जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच होते. शासनाने आरक्षण जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका श्री. जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे.

Maratha Andolan
Tulajapur Rasta Roko Andolan : शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानीकडून रास्ता रोको आंदोलन

लाठीमाराचे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत आंदोलने, रास्ता-रोको करण्यात आला.

त्याचबरोबर संवाद यात्रेसाठी अकोला दौऱ्यावर आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा बाळापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर अडविण्याचा प्रयत्न केला.

शेळद फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यांवर उतरत आंदोलन केले. वाशीम जिल्ह्यांतही रास्ता रोको, कडकडीत बंद पाळण्यात आला.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान जालना येथील मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनात महिला, मुलांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. हे राज्य सरकारी यंत्रणेचे भेसूर रूप आहे. त्यामुळे दुटप्पी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या तरूणांनी आंदोलकांनी केली आहे.

आंतरवाली(जालना) येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या पोलिस लाठीमाराच्या तीव्र प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्यात उमटत आहेत. वणी (ता. दिंडोरी), धुळगाव (ता. येवला), पांगरी (ता. सिन्नर), नामपूर (ता. सटाणा) येथे झालेल्या रास्ता-रोको प्रसंगी मराठा समाजाच्या आंदोलकांनी घोषणाबाजी करित ‘गृहमंत्री राजीनामा द्या’अशी मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com