Farmers' yarn mills : चार महिन्यांपासून बंद शेतकरी सूतगिरणी सुरू

नव्या संचालक मंडळाकडून प्रयत्न; उत्पादनाला प्रारंभ
yarn mill
yarn millAgrowon

सोलापूर ः कापसाच्या तुटवड्यासह अन्य तांत्रिक अडचणीमुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेल्या सांगोला येथील शेतकरी सहकारी सूत गिरणीमध्ये (Farmer's Co-operative Yarn Mill) मंगळवारी (ता. ६) अखेर उत्पादनाला सुरुवात झाली. शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून सूतगिरणीतील उत्पादनाला प्रारंभ झाला.

yarn mill
Yarn Mill Election : सूतगिरणी निवडणुकीतून दिग्गजांची माघार

शेतकरी सूतगिरणी साधारण एप्रिल महिन्यापासूनच आर्थिक अडचणीत आली होती. कापसाचा तुटवडा आणि त्यात कापसाचा प्रतिखंडी वाढणारा दर या दोन्हींमुळे गिरणीसमोर मोठी अडचण झाली होती. त्यामुळे ११ ऑगस्टपासून गिरणीचे उत्पादन बंद करण्यात आले होते. त्यातच गिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली होती. ‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक आणि गिरणीची ही स्थिती निर्माण झाल्याने पेच निर्माण झाला होता. पण सर्व राजकीय पक्षांनी साथ देत ही निवडणूक बिनविरोध केली. त्यानंतर नव्या संचालक मंडळाने गिरणी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

yarn mill
Farmer Suicide : चार वर्षांच्या तुलनेत यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ

सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सहभाग योजनेअंतर्गत सुमारे दहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यापैकी सुमारे पाच कोटी रुपये अल्पमुदत कर्ज घेऊन गिरणी चालू करण्यात आली. त्यानुसार स्व. माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांच्याहस्ते पूजेने उत्पादनाला सुरुवात झाली.

yarn mill
Sugar Mill : ऊसदर जाहीर करूनच कारखाने सुरू करा : सचिन नलवडे

या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. निकिता देशमुख, गिरणीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी, अॅड. नितीन गव्हाणे, संचालक चंद्रकांत देशमुख, अण्णासाहेब देशमुख, बाबासाहेब करांडे, महिला सूत गिरणीचे अध्यक्ष लक्ष्मण माळी, उपाध्यक्षा कल्पना शिंगाडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com