Onion Subsidy : शेतकऱ्यांना मिळणार कांद्याचे अनुदान

जिल्ह्यातील ११७२ शेतकऱ्यांची यादी; २०१८-१९ पासून अनुदान प्रलंबित
 Onion Subsidy
Onion SubsidyAgrowon
Published on
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील एक हजार १७२ शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दोनशे रुपयांचे कांदा पिकाचे अनुदान मिळणार आहे. २०१८-१९ या वर्षातील कांदा उत्पादकांचे ते अनुदान आहे. त्यांना अजूनही अनुदान मिळाले नव्हते, पण आता त्यांच्यासाठी दोन कोटी १४ लाखांचे अनुदान मिळणार आहे.

 Onion Subsidy
Incentive Subsidy : शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान कधीपासून मिळणार ? | ॲग्रोवन

कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले, पण २०१८-१९ कांद्याचे दर खूपच कमी झाले होते. त्यावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. चार वर्षे होऊनही काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते. आता सरकारने त्या शेतकऱ्यांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाली आहे. त्याची पडताळणी करून पुन्हा यादी शासनाला सादर करण्यात आली आहे. दोन कोटी १४ लाख रुपयांचे अनुदान पावणेबाराशे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. आठ-दहा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल, असे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मोहोळ, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यातील बहुतेक शेतकरी आहेत. ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळी बॅंक खाते क्रमांक दिले होते, त्यावर ते अनुदान जमा होणार आहे. ज्यांचे खाते बंद पडले, त्यांच्याकडून पुन्हा नवीन खाते क्रमांक घेतले जातील.

 Onion Subsidy
Agriculture Subsidy : शेततळे, रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

कांद्याचे दर वाढलेच नाहीत

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण, कांद्याचे दर अजूनही स्थिर आहेत. सोलापूर बाजार समितीत बुधवारी (ता. २१) २७४ गाड्यांची आवक होती. चांगल्या कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार ४०० रुपये आणि सरासरी दर १४०० रुपयांपर्यंत होता. बहुतेक शेतकऱ्यांना सतराशे ते अठराशे रुपयांचाच दर मिळत आहे. कांद्याचे दर वाढतील या आशेने काही शेतकऱ्यांनी कांदा काढणी लांबणीवर टाकली आहे. पण, मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढलेच नाहीत. जुन्या कांद्यामुळे यंदा लवकर भाव वाढले नाहीत, येत्या काही दिवसांत वाढतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com