
Nashik News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यात दुडगाव (ता. नाशिक) येथील नीलेश चव्हाण याने (वय २७) (Nilesh Chavan) वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. विशेषतः तो एका वर्षात एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून दोन वेळा उत्तीर्ण झाला आहे.
नाशिक तालुक्यातील महिरावणीजवळील एक हजार लोकसंख्या असलेल्या दुडगाव या आदिवासी बहुल गावातील शेतकरी शरद चव्हाण यांचा नीलेश मुलगा आहे.
आयटी इंजिनिअरिंग केलेल्या नीलेश याने २०२१ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात ओबीसी प्रवर्गातून पाचवा क्रमांक, तर महाराष्ट्रात २५ वा क्रमांक पटकाविला आहे. त्याचा हा प्रवास तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
दुडगाव येथील ग्रामस्थांनी नीलेश याची मिरवणूक काढत नागरी सत्कार केला. या वेळी माजी महापौर दशरथ पाटील, विलास शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भदाणे, मुरलीधर पाटील, दिनकर आढाव, करण गायकर, विष्णुपंत म्हैसधुणे, नयना घोलप, संपत सकाळे, गोपाळराव पाटील, बाजीराव भागवत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
नीलेश याने २०२० मध्ये एमपीएससी परीक्षा दिली असता, त्यातही त्याने राज्य कर निरीक्षक या पदाला गवसणी घातली होती. २०२१ मध्येहीही यश मिळवीत त्याने वनपरिक्षेत्र अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
नीलेश याने प्राथमिक शिक्षण दुडगावात, माध्यमिक शिक्षण कोपरगाव येथील जंगली महाराज आश्रमात घेतले तर, बारामती येथून बीएस्सी ॲग्री बायोटेकची पदवी घेतली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.