Agriculture Income : शेतकऱ्यांनी जास्त उत्पन्नापेक्षा शाश्वत उत्पन्नाकडे वळावे

Sustainable Agriculture : शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व शास्त्रज्ञानी शेतकऱ्यांना शास्त्रीय शेतीबद्दल नियमितपणे मार्गदर्शन करणेही गरजेचे आहे.
Agriculture
Agriculture Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व शास्त्रज्ञानी शेतकऱ्यांना शास्त्रीय शेतीबद्दल नियमितपणे मार्गदर्शन करणेही गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने शेती करत असताना जास्त उत्पन्नापेक्षा शाश्वत उत्पनाकडे वळावे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

भाकृअप-एनआयसीपीएम, नवी दिल्ली व वनामकृवि परभणी कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद जिल्ह्यासाठी ‘‘टोमॅटो व वांगी पिकातील एकात्मिक सूत्रकृमी व्यवस्थापन प्रकल्प’’ चे उद्घाटक म्हणून शुक्रवारी (ता. 7) कुलगुरू बोलत होते.

Agriculture
APMC Income : राज्यातील बाजार समित्यांचे वार्षिक उत्पन्न ९२४ कोटींवर

याप्रसंगी वनामकृवि परभणीचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.डी.बी. देवसरकर, भा.कृ.अ.प - एनआयसीपीएम, नवी दिल्लीचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. मुकेश सेहगल, फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. एम. वाघमारे, डॉ. संजय पाटील, डॉ. डी. जी. हिंगोले, डॉ. सी. बी. पाटील, कृषी विज्ञान केंद्र, डॉ.सचिन सोमवंशी, डॉ. किशोर झाडे आदींची उपस्थिती होती.

कुलगुरू म्हणाले, की कमीत-कमी रासायनिक व गुणवत्तायुक्त उत्पादनाकडे वळावे. शेतीवर होणारा खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांचा विकास हेच विद्यापीठाचे व त्यामधील प्रत्येक घटकाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झाला तर विद्यापीठाचा व समाजाचा होईल.

डॉ. सेहगल म्हणाले, की सूत्रकृमी हा डोळ्यांना न दिसणारा अदृश्य शत्रू असल्याने नियंत्रणास अवघड आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सुरवातीपासूनच एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. डॉ. देवसरकर म्हणाले, की हा प्रकल्प सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी वनामकृवि परभणी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादद्वारे सर्वोतपरी प्रयत्न केले जातील.

Agriculture
Agriculture Income : काळ प्रकल्‍पामुळे शेती उत्‍पन्नात वाढ

यावेळी शेतकरी अशोक वहाटूळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रतिनिधिक स्वरूपामध्ये ०५ शेतकऱ्यांना जैविक बुरशीनाशकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. किशोर झाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवा काजळे, जयदीप बनसोडे, जयदेव सिंगल व इतर कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.

यावेळी शेतकरी अशोक वहाटूळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रतिनिधिक स्वरूपामध्ये ०५ शेतकऱ्यांना जैविक बुरशीनाशकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. किशोर झाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवा काजळे, जयदीप बनसोडे, जयदेव सिंगल व इतर कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com