Silk Cocoon Market : मराठवाड्यात रेशीम कोष विक्रीला शेतकऱ्यांची पसंती

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ अखेरपर्यंत मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड या तीन बाजारपेठांत १४७५ टन रेशीम कोषांची खरेदी झाली.
Silk Cocoon Market
Silk Cocoon MarketAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ अखेरपर्यंत मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड या तीन बाजारपेठांत १४७५ टन रेशीम कोषांची खरेदी (Silk Cocoon Market) झाली. त्यातून जवळपास ७६ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.

मराठवाड्यातील रेशीम कोष कर्नाटकातील रामनगरमच्या बाजारपेठेत नेताना व तिथे नेल्यानंतर अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते.

त्यातूनच प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रात सर्वात पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ जालना बाजार समितीत सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने परभणी, बीड येथेही बाजारपेठ सुरू झाली.

या तीनही बाजारपेठांत रेशीम कोषांची आवक व उलाढाल सातत्याने वाढते आहे.

एक एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान तीनही बाजारपेठांत मिळून १५ हजार ७३६ शेतकऱ्यांनी १४७५.४१० टन कोषांची विक्री केली. जालना बाजार समितीत ४३ कोटी ६१ लाख ३५ हजार रुपये, परभणी बाजारपेठेत ६ कोटी ८० लाख ५५ हजार तर बीड बाजार समितीत २५ कोटी ९३ लाख ३५ हजार रुपयांची उलाढाल झाली. तसेच येथील कोषांचे सरासरी दरही वाढतेच राहिले आहेत.

Silk Cocoon Market
Silk Cocoon Production : सांगलीत रेशीम कोष उत्पादनात होतेय वाढ

जालना बाजार समितीत २०२१-२२ मध्ये कोषांना सरासरी ५१,३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २०२३-२४ मध्ये सरासरी ५२ हजार ३०० रुपये दर राहिला. परभणीत २०२३-२४ मध्ये सरासरी ५१ हजार ९०० रुपये दर मिळाला.

तर बीड बाजार समितीत कोषांना सरासरी दर ५० हजार ८०० रुपये मिळाला. बीड बाजार समितीत काही महिन्यांत झालेली ५१० टन कोष खरेदी दखलपात्र आहे, हे विशेष.

बाजारपेठनिहाय कोष खरेदी (टनांत) व शेतकरी संख्या

बाजारपेठ...शेतकरी...विक्री झालेले कोष

जालना...९३७५...८३४

परभणी...१४१०...१३१

बीड...४९५१...५१०

१२ एप्रिल रोजी रामनगरम मार्केटला सरासरी दर ५२३०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. दुसरीकडे जालना मार्केटला सर्वोच्च दर ५२००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. तुलना केल्यास जालना रेशीम बाजार शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरली आहे.
- अजय मोहिते, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com