

Jalgaon News : जिल्ह्यात केळीच्या विपणानासह, व्यापारास बळ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान रॅक योजना किंवा अनुदानाची मागणी लावून धरली होती. त्यासंबंधी दिल्ली दरबारी पाठपुरावादेखील झाला. परंतु हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
जळगाव जिल्ह्यातील काही शेतकरी, खरेदीदार आदींनी मागील वर्षी नवी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. बंद असलेल्या अनुदानावरील किसान रॅकच्या व्हीपीयू वॅगन्स पुन्हा सुरू करण्यासाठीचे निवेदन त्यांना देण्यात आले होते.
जिल्ह्यातील रावेर व सावदा रेल्वेस्थानकातून नवीदिल्ली येथे व्हीपीयू वॅगन्समधून केळी पाठविली जाते. त्यासाठी मागील वर्षी अनुदान मिळत होते. परंतु हे अनुदान बंद झाले असून, ही योजना पुन्हा सुरू करण्याची गरज आहे, असा मुद्दा शेतकरी, खरेदीदार उपस्थित करीत आहेत.
रेल्वेने केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानित किसान रॅकच्या वॅगन्स सुरू केल्या होत्या. परंतु ही योजना किंवा वॅगन्स एप्रिल २०२२ पासून बंद केली आहे.
त्यासंबंधी रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांना साकडे घालून वॅगन्स किंवा अनुदान पुन्हा मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. या योजनेसाठी मंजूर अनुदान संपले होते. ते पुन्हा देण्यात आले नाही.
केंद्र सरकारने अन्न व औषधी मंत्रालयालांतर्गत ही योजना दिली होती. देशभरातून शेतमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात झाली व त्याचा लाभ अनेकांना मिळाला.
नंतर हे सर्व अनुदान संपले. आणखी वर ५० कोटी रुपयांचे अनुदान रेल्वे मंत्रालयाला द्यावे लागेल, त्या वेळेस ही योजना पुन्हा सुरू होईल किंवा केळी वाहतुकीसाठी व्हीपीयू वॅगन्स अनुदानावर मिळू शकतील.
मंजूर अनुदान संपल्याने आता आणखी अनुदान मिळून किसान रॅक सुरू होण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घ्यावा लागेल, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.