
लातूर : हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या (Indian Oilseeds Research Institute) वतीने १७ ते २१ जानेवारी दरम्यान वनस्पती तेल (Edible Oil) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे (International Conference) आयोजन करण्यात आले होते.
यात देश-विदेशातील शास्त्रज्ञांचा सहभाग नोंदविला होता. या परिषदेत लातूर जिल्ह्यातील तेलबिया पीक उत्पादक (Oilseed crop producer) शेतकरी संजय नाडे आणि जवस उत्पादक शेतकरी अशोक चिंते यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी भारतीय तेलबिया संशोधन केंद्राचे महासचिव डॉ. सतीश कुमार, परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. संजीव गुप्ता, कार्यकारी अध्यक्ष डॉ. आर. के. माथुर, आयोजन सचिव डॉ. एम. सुजाथा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री चिंते आणि श्री नाडे हे गेल्या ३ ते ४ वर्षापासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्या लातूर येथून प्रसारित झालेले जवसाचे वाण एनएसएस-९३ यांची लागवड करून चांगले उत्पादन घेत आहेत.
श्री चिंते गेल्या ३ ते ४ वर्षापासून जवसाची लागवड करीत असून केवळ ९० दिवसात येणा-या एलएसएस-९३ वाणापासुन त्यांना चांगला आर्थिक लाभ झाला, ते इतरही शेतक-यांना जवस लागवडीबाबत मार्गदर्शन करतात.
गेल्या वर्षी त्यांनी जवसाचे हेक्टरी १७.५ क्विंटलचे उत्पादन घेतले. तर श्री नाडे हे गेल्या ३ वर्षापासून विद्यापीठ विकसित करडई पिकाचे वाण पीबीएनएस-१२ आणि जवसाची एलएसएल-९३ या तेलवर्गीय पिकांची लागवड करतात.
करडई पासून त्यांनी हेक्टरी २५ क्विंटल तसेच ऊस पिकांत जवसाचे अंतर पीक पद्धतीतून १० क्विंटल चांगले उत्पादन घेतले आहे.
या शेतकरी बांधवांना लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एम. के. घोडके आणि त्यांचे सहकारी हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात. या सन्मानाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इंद्र मणी व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.