Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Crop Insurance : कमी पीकविम्याबाबत शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पांगरी नवघरे गावातील शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असताना काही शेतकऱ्यांना अल्प मदत प्राप्त होत आहे.
Published on

वाशीम ः मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात पीकविमा (Crop Insurance) मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मानजनक रक्कम जमा करावी, अशी मागणी पांगरी नवघरे येथील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : रब्बी पीकविम्याचे ४२ हजार प्रस्ताव

पांगरी नवघरे गावातील शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असताना काही शेतकऱ्यांना अल्प मदत प्राप्त होत आहे. चार हजार रुपये भरले तर चारशे रुपये मिळाले, अशाप्रमाणे विमा मदत मिळत आहे.

Crop Insurance
Pomegranate Crop Insurance : डाळिंब पीकविम्यात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा

ज्या शेतकऱ्यांनी मोबाईलवरून विमा कंपनीला तक्रार केली असताना संबंधित पीकविमा कंपनीकडून डॉकेट आयडी येऊन सुद्धा अशा लोकांच्या शेतीचा पंचनामा झालेला नाही. आता काही अतिवृष्टिग्रस्तांना निधी प्राप्त होत आहे. त्यामध्ये सामायिक क्षेत्रामधील शेतकऱ्यांचा निधी प्रश्‍न प्रलंबित आहे.

अशा सामाईक क्षेत्र संदर्भातील अतिवृष्टिग्रस्तांची मदत तत्काळ खात्यामध्ये जमा करावी. यासंदर्भात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खतामध्ये त्यांच्या वाटेची रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com