
नगर : गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी (Heavy Rain) व महापुराच्या (Flood Crisis) संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या (Mahavitaran) हलगर्जी कारभाराचा फटका बसला आहे. जास्त पावसाने खरीप हंगाम (Kharif Season) वाया गेला असतानाच खरडगाव वीज उपकेंद्रांतील आठ गावांत दुरुस्तीची अपूर्ण कामे व खंडित वीजपुरवठ्यामुळे (Power Supply) रब्बी हंगामदेखील (Rabi Season) धोक्यात सापडला. या बाबत वरूर येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली आहे.
खरडगावच्या ३३ केव्ही उपकेंद्रातील गावे गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी व महापुराच्या संकटाचा सामना करत आहेत. जास्त पावसाने खरिपातील बहुतांश पिके वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. गहू, हरभरा, ज्वारी, तूर, कपाशी, कांदा, ऊस या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. मात्र गेल्या पाच ते सात महिन्यांपासून खरडगाव वीज उपकेंद्राच्या रोहित्रामध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.
मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी अभियंत्यांना दिले. वरील बाब वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणली. परंतु त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. यासाठी आठ गावांतील रब्बी हंगामाच्या उर्वरित पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या चार-सहा दिवसांत पुरेसा वीजपुरवठा झाला नाही, तर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.