Gokul Milk Rate
Gokul Milk RateAgrowon

Gokul Milk Rate : 'गोकुळ'ने गाय दूध दरात केलेली कपात अन्यायकारक, शेतकऱ्यांचा संताप

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या गोकुळ दूध संघाकडून गायीच्या दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला.
Published on

Kolhapur Jilha Dudh Sangh : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या गोकुळ दूध संघाकडून गायीच्या दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. यावर कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.

लम्पीमुळे गायीची संख्या कमी होत आहे आणि दुसरीकडे दर कमी झाल्यामुळे उत्पादकांचे गणित बिघडण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान ही दरवाढ नव्याने पूर्ववत करावी, असा सूर उमटत आहे.

गोकुळने म्हैस दूध दरात प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ करुन दिलासा दिला. मात्र, गाय दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्यामुळे दूध उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली. करवीर, राधानगरी, गारगोटी तालुक्यातील गावांमध्ये कपात केलेले दर पुन्हा वाढवावेत, यासाठी आंदोलन करण्यात आले.

गोकुळकडून वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट्य आहे. यामध्ये गाय दूधाचे संकलनही महत्त्वाचे आहे. एकीकडे तरुणांनी दूध उत्पादन व्यवसाय करावा यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींकडून आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे दरात कपात झाल्यामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जात आहे. गायीसाठी चारा, औषधपाणी यासह इतर खर्च करताना मेटाकुटीला आलेल्या उत्पादकाला दर कपातीचा धक्का सहन होणार नसल्याची प्रतिक्रीया दूध उत्पादकांनी दिली.

Gokul Milk Rate
Gokul Milk Rate : 'गोकुळ'कडून म्हैस दूध उत्पादकांना दिलासा तर गाय पशुपालकांना धक्का

गोकुळ दूध संघाने तीन महिन्यांत दोन वेळा गाय दूध दरात चार रुपये कपात केली आहे. याच्या निषेधार्थ बहिरेश्वर (ता. करवीर) येथील दूध उत्पादक शेतकन्यांनी सायंकाळी वेताळ चौकात घोषणाबाजी केली. आठ दिवसांत दरवाढ न केल्यास आमच्या दुधाची विल्हेवाट आम्ही लावू, असा इशाराच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघाला दिला.

बहिरेश्वर दूध उत्पादन करणारे प्रमुख गाव आहे. येथे दररोज ६ हजार ५०० हजार लिटर दूधसंकलन होते. त्यापैकी ५ हजार लिटर दूध गायीचे आहे. पशुखाद्य, वैरण, मजुरी यांचे दर भरमसाट वाढले. पण दर कमी केल्यामुळे दूध व्यवसाय न परवडणारा झाला आहे.

गोकुळ दूध संघाने गाय दूध दरात अन्यायकारक केलेली कपात त्वरित मागे घ्यावी. अन्यथा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी गुरुवारी (ता. ५) गोल् राज्य मार्गावर रास्ता रोको करणार, असा इशारा दूध उत्पादक सभासदांनी निवेदनाद्वारे दिला. याबाबतचे निवेदन गोकुळच्या येथील विभागीय कार्यालय व भुदरगड पोलिसांना दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com