
Nagar News : जिल्ह्यात यंदा साखर कारखान्यांना गाळपासाठी १ लाख ५३ लाख १७३ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. मुळात यंदा गतवर्षीपेक्षा कमी क्षेत्रावर ऊस आहे. त्यातच यंदा पुरेसा पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस जाईल. त्यामुळे साखर कारखान्यांना गाळप करताना ऊस टंचाईला सामोरे जावे लागू शकते.
गेल्यावर्षी अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्यांचे उंबरठे झिजवावे लागले. त्याच भागात यंदा उसाची पळवापळवीही होऊ शकते, असेही शेतकरी सांगत आहेत. नगर विभागात खासगी व सहकारी मिळून २७ साखर कारखाने आहेत. त्यात नगर जिल्ह्यात २२ साखर कारखाने असून दरवर्षी साधारणपणे दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील उसाचे गाळप होते.
दोन-तीन वर्षांच्या काळात चांगला पाऊस झाला असल्याने उसाचे क्षेत्र वाढले. यंदा मात्र सुरवातीपासूनच पाऊस नाही. त्यामुळे यंदा खरिपाच्या सुरवातीची ऊस लागवडही कमी झाली आहे. शिवाय, पावसाअभावी खरिपाची पिके वाया गेली.
अन्य स्त्रोताद्वारे उपलब्ध होणारा चाराही मिळेनासा झाला आहे. खरीप पिकांतील चाराही मिळण्याची शक्यता कमी आहे. नदी, नाले, तलाव, गाव तलाव, पाझर तलावांसह अन्य पाण्याचे स्त्रोत कोरडे आहेत. त्यामुळे भविष्यातही चारा उत्पादन होईल, याची शक्यता कमी आहे.
यंदा जिल्ह्यात ३३ हजार ८८२ हेक्टरवर आडसाली ऊस, ३० हजार १३४ हेक्टरवर पूर्वहंगामी, २९ हजार २५३ हेक्टरवर सुरू आणि ५९ हजार ९४५ हेक्टरवर खोडवा असा १ लाख ५३ हजार १७३ हेक्टरवर ऊस आहे. श्रीगोंदा, नेवाशात सर्वाधिक ऊस उपलब्ध आहे.
तालुकानिहाय ऊस उपलब्धता (हेक्टर)
नगर, ः १३४१, पारनेर ः ३२७५, श्रीगोंदा ः २५६६६, कर्जत ः १८६७८, जामखेड ः ३८००, शेवगाव ः १४६४१, पाथर्डी ः ७००४, नेवासा ः २५२८१, राहुरी ः ९६२४, संगमनेर ः १३९३०, अकोले ः २६०५, कोपरगाव ः ८३११, श्रीरामपूर ः १०४५९, राहाता ः ८५५५.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.