Paddy Procurement : धान, भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

‘खरीप पणन हंगाम २०२२-२३’ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत होती.
Paddy Procurement
Paddy ProcurementAgrowon
Published on: 
Updated on: 

नाशिक : ‘खरीप पणन हंगाम (Kharip Marketing Season) २०२२-२३’ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. मात्र शेतकरी नोंदणी पुरेशी झाली नाही.

Paddy Procurement
Onion Rate : कांदा उत्पादकांचा पुन्हा भ्रमनिरास | ॲग्रोवन

त्यामुळे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून पहिल्यांदा २१ ऑक्टोबर, दुसऱ्यांदा १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तर आता पुन्हा तिसऱ्यांदा ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबाबत विभागाचे अवर सचिव संतोष कराड यांनी परिपत्रक काढले आहे.

‘‘धान व भरडधान्य खरेदीसाठी नावनोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल,’’ असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले. मुदतवाढीबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सूचित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.