Banana Export : पाचलगावच्या केळीची इराणमध्ये निर्यात

Banana Cultivation : गेल्या दोन दिवसांत ६६० झाडांपासून जवळपास १८ टन मालाची तोडणी करून निर्जंतुकीकरण व पॅकिंग करून प्रीक्युलिंगसाठी पाठविण्यात आली आहेत.
Banana Export
Banana ExportAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajingar News : पैठण तालुक्यातील पाचलगाव येथील प्रगतिशील शेतकरी तथा पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बद्रीनाथ बापू बोंबले यांनी आपल्या साडेतीन एकर केळीच्या बागेत केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेतले असून, त्यांच्या बागेतील दर्जेदार केळीची इराण देशात निर्यात सुरू झाली आहे.

आताच्या घडीला प्रति झाड २८ किलो ३०० ग्रॅमचे केळीचे होत असलेले उत्पादन पाहता त्यांच्या साडेचार हजार केळीच्या झाडापासून किमान १२६ टन केळीच्या उत्पादनाची अपेक्षा श्री. बोंबले यांना आहे. गेल्या दोन दिवसांत ६६० झाडांपासून जवळपास १८ टन मालाची तोडणी करून निर्जंतुकीकरण व पॅकिंग करून प्रीक्युलिंगसाठी पाठविण्यात आली आहेत. निर्यातदारामार्फत ही केळी थेट इराण येथील बाजारपेठेत जाणार आहे.

Banana Export
Tissue Culture Banana : उतिसंवर्धित केळी रोपांची मागणी अधिक, पुरवठा कमी

या केळीला १८ रुपये प्रति किलोचा दर मिळाला असल्याची माहिती शेतकरी श्री. बोंबले यांनी दिली. ऑगस्ट २०२२ मध्ये ६ बाय ५ फूट अंतरावर लावलेल्या या केळी उत्पादनासाठी तज्ज्ञ डॉ. अनिल माकोडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे श्री. बोंबले म्हणाले.

याशिवाय मयांक गांधी यांचे ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या सहकार्याने टिश्‍यू कल्चर रोपे मागील वर्षी केवळ सात रुपये दराने लागवडीसाठी मिळाल्याने लागवड खर्चात फायदा झाल्याचेही श्री. बोंबले यांनी सांगितले.

Banana Export
Banana Board : केळी महामंडळासाठी विद्यापीठाऐवजी कृषी विज्ञान केंद्राचीच जागा योग्य

केळीला कीड व बुरशीपासून संरक्षण होण्यासाठी वेळोवेळी कधी सेंद्रिय, तर कधी रासायनिक कीटक व बुरशीनाशकाची फवारणी करण्यात आली. ठिबकमधून विद्राव्य खते वाढीनुसार, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी देण्यात आली. एकरी जवळपास एक लाख रुपये वर्षभरात त्यांना खर्च आला.

मे महिन्यात अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे केळी बागेचे मोठे नुकसान होऊन जवळपास ५०० झाडे जमीनदोस्त झाली होती. तरीही या संकटाला न डगमगता नव्या जोमाने कामाला लागून निर्यातक्षम केळी बाग तयार केल्याचे युवा शेतकरी संतोष बद्रीनाथ बोंबले पाटील यांनी सांगितले.

अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा केळी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या तीनही मुलांनी केळीच्या बागेला रात्रंदिवस पाणी, खते, फवारणी करण्याचे उत्तम नियोजन केले. आता टप्प्याटप्प्याने केळी विक्रीचे नियोजन आहे.
- बद्रीनाथ बापू बोंबले पाटील, केळी उत्पादक प्रगतिशील शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com