Agriculture Department : चार महिने उलटले तरीही मागण्यांबाबत न्याय मिळेना

लिपिक पदे कमी न करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती देणे, सेवाप्रवेशोत्तर परीक्षा घेणे अशा विविध मागण्यासंदर्भात चार महिने लोटले तरी न्याय मिळत नाही.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News लिपिक पदे कमी न करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती देणे, सेवाप्रवेशोत्तर परीक्षा घेणे अशा विविध मागण्यासंदर्भात चार महिने लोटले तरी न्याय मिळत नाही. याबाबत लक्ष वेधण्यासाठी लिपिक संघटना (Clerical Association) आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

बुधवारी (ता.१०) महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेच्या वतीने कृषी आयुक्तालय (सेंट्रल बिल्डिंग) येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली.

विविध मागण्याबाबात संघटनेने अनेकवेळा मागण्याचे निवेदन दिले आहे. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने संघटनेने राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना निवेदन पाठवून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

तसेच १५ ते १९ मे या काळात संभाग स्तरवार धरणे आंदोलन, तर २२ मे पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संघटनेने कृषी विभागाच्या लिपिक संवर्गाचा प्रस्तावित आकृतिबंध तयार करून शासनास व कृषी आयुक्तालयात वेळोवेळी सादर केलेला आहे. त्यात लिपीकवर्गीय पदे कपात करू नये, अशी मागणी केलेली आहे.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभागातील पदे १०० दिवसांत भरणार

संघटनेने केलेल्या मागण्या :

- लिपीकवर्गीय गट ‘क’मधील समिती नेमणूक करून पदोन्नतीचे स्तर कमी होण्याबाबत कार्यवाही करावी

- विभागीय कृषी सहसंचालक या ठिकाणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे पद निर्माण करावे

- वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक ही पदे सरळ सेवेऐवजी १०० पदोन्नतीनेच भरली जावीत

Agriculture Department
Agriculture Department : कृषिसेवकांची मानधनवाढ अंतिम निर्णयाअभावी रखडली

- प्रतिनियुक्तीवरील प्रशासकीय अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक ही पदे चिन्हांकित होऊन मूळ मंजूर पदांमध्ये समाविष्ट करावीत

- कृषी भवन येथे नविन प्रस्तावित इमारतीमध्ये संघटनेच्या कार्यालयास जागा द्यावी

- विभागामध्ये कर्मचाऱ्यांसाठी विभागीय सेवाप्रवेशोत्तर परीक्षा वर्षातून दोन वेळा घ्यावी

- पूर्वीसारखे कृषी विभागामध्ये कृषी आयुक्तालय स्तर ते जिल्हास्तरापर्यंत अंतर्गत लेखा परिक्षण स्वतंत्र कक्ष तयार करून त्यामध्ये लिपिक संवर्गीय पदे नेमावीत

- शासनाने संभागीय बदल्यांच्या धोरणात सुधारणा कराव्या

- राज्य प्रशिक्षण धोरण २०११ नुसार लेखा व प्रशासकीय बाबींचे प्रशिक्षण, उजळणी प्रशिक्षण देण्याबाबत निर्णय व्हावा

- लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांना तांत्रिक पदाचे कामे देण्यात येतात. याबाबत आदेश द्यावा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com