Dr. Vijay Gavit
Dr. Vijay GavitAgrowon

Dairy Development : दुग्ध विकास उपक्रमातून आदिवासींचे सक्षमीकरण ः मंत्री डॉ. गावित

Tribal Empowerment : दुग्धविकास प्रकल्प हा पथदर्शी असून, पहिल्या टप्प्यात गुजरात सीमावर्ती भागात राबविण्यात येत आहे. नाशिक (सुरगाणा), नंदुरबार, धुळे (साक्री) या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यात आला.
Published on

Nashik News : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत संयुक्त दायित्व गटाची स्थापना करून पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही तालुक्यांत हा उपक्रम राबविला जात असून, तेथे यशस्वी झाल्यास राज्यभर हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे दुर्गम अतिदुर्गम भागात आदिवासी बांधव आर्थिक सक्षम होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक आणि सुमूल (सुरत डिस्ट्रिक्ट मिल्क को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लि.) यांच्यातर्फे आदिवासींसाठी संयुक्त दायित्व गटांच्या माध्यमातून पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत गुरुवारी (ता. १४) डॉ. गावित यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

Dr. Vijay Gavit
Dairy Farming : विदर्भात दुग्धव्यवसायाच्या प्रसारासाठी ४०० कोटींचा कार्यक्रम

आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, ‘सुमूल’चे व्यवस्थापकीय संचालक अरुण पुरोहित, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, तुषार माळी, आदिवासी आयुक्त विनिता सोनवणे, संतोष ठुबे, आदिवासी मोर्चाचे एन. डी. गावित यांसह लाभार्थी उपस्थित होते.

डॉ. गावित म्हणाले, की दुग्धविकास प्रकल्प हा पथदर्शी असून, पहिल्या टप्प्यात गुजरात सीमावर्ती भागात राबविण्यात येत आहे. नाशिक (सुरगाणा), नंदुरबार, धुळे (साक्री) या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यात आला.

Dr. Vijay Gavit
Dairy Products : दुग्धजन्य पदार्थ निर्मितीतून प्रगतीची दिशा

पुढच्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू व तलासरी आदींसह संपूर्ण आदिवासी भागात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत खरेदी केलेल्या जनावरांच्या विक्रीवर बंदी असेल. सुमूल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे या उपक्रमाला सहकार्य असेल.

आदिवासींतील लोकांचे उत्पन्न वाढीला यातून हातभार लागणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक पुरोहित यांनी सांगितले. या पथदर्शी उपक्रमातून १२ हजार ५०० कुटुंबांत क्रांती घडणार असल्याचे आयुक्त गुंडे यांनी सांगितले. सुरगाणा तालुक्यातील लाभार्थ्यांचा मंत्री गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महामंडळाचे व्यवस्थापक बाबासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com