Maharashtra Electricity Rate : ऐन उन्हाळ्यात सामान्य जनतेला महावितरणने (Mahavitaran) वीज दरवाढीचा (Electricity Rate) झटका दिला आहे. आधिच महागाईचे (Inflation) चटके सोसणाऱ्या सामान्यांच्या खिशाला यामुळे कात्री लागणार आहे.
आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच एमएसईडीसीएलसह (MSEDCL), टाटा पॉवर (Tata Power), बेस्ट आणि अदानी पॉवर (Adani Power) या वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या वीज दरात वाढ झाली आहे.
यामुळे घरगुती वीजेच्या दरांमध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. महावितरणने वाढीव वीज दराचा भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.
वीज दरवाढी संदर्भात महावितरणसह खासगी वीज कंपन्यांनी वीजदर निश्चितीबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यावर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर जनसुनावणीही झाली होती. त्यामुळे राज्यात १ एप्रिलपासून नवे वीजदर लागू करण्यात आले आहेत.
यानुसार, एमएसईडीसीएलच्या ग्राहकांना २०२३-२४ मध्ये सरासरी २.९ टक्के तर २०२४-२५ साठी ५.६ टक्के दरवाढ केली आहे. नव्या दरवाढीमुळे घरगुती वापराच्या वीज दरांत सहा टक्के वाढ झाली आहे.
राज्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे वीजेची मागणीही वाढली आहे. वीजेचा वापरही वाढणार आहे. त्यामुळे वीजबिलातही वाढ होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.