Gram Panchayats Election : परभणी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

परभणी तालुक्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायती, नव्याने स्थापित
Gram Panchayats Election
Gram Panchayats ElectionAgrowon
Published on
Updated on

परभणी : परभणी तालुक्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायती, (Gram Panchayats Election) नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या (सदस्य पदासह पेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये परभणी तालुक्यातील पिंपळगाव स.मि., शहापुर,पेडगाव,हसनापुर/तुळजापूर,साडेगाव,वाडी दमई, सनपुरी/सुलतानपूर,साटला,मटक-हाळा,पिंपरी देशमुख,बाभळी,तट्टू जवळा,मिरखेल,पिंगळी बाजार, शेंद्रा,पाथरा,टाकळी कु.,नांदखेडा,आसोला,कारेगाव, पारवा,कौडगाव,रायपुर,बाभळगाव,ईठलापुर दे., सायाळा ख.,साळापुरी,धसाडी,झाडगाव या २९ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Gram Panchayats Election
Crop Damage Compensation : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीअभावी मदतच मिळेना

निवडणूक कार्यक्रम असा...

या निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची ता.१८ नोव्हेंबर असून नामनिर्देशन पत्रे मागविण्याची व सादर करण्याची ता.२ ८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर असणार आहे. ता.५ डिसेंबर रोजी छाननी करण्यात येणार असून नामनिर्देशपत्र मागे घेण्याचा अंतिम तारीख ता.७डिसेंबर असणार आहे.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची ता.७ डिसेंबर, आणि आवश्यक असल्यास मतदानाचा ता.१८ डिसेंबर तर मतमोजणीची ता.२० डिसेंबर रोजी असणार आहे. तर निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची अंतिम दिनांक ही २३ डिसेंबर असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com