Maharashtra Politics: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

आज केवळ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाच शपथविधी होणार असे जाहीर करण्यात आले. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P.Nadda) यांच्या सूचनेनुसार फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon

राज्यात मागील दोन आठवडे सुरू असलेल्या सत्तानाट्यानंतर आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackery) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचे स्मरण केले. यावेळी उपस्थित शिवसेनेच्या नेत्यांनी "बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो" अशा घोषणा दिल्या. त्यानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

फडणवीस आणि शिंदे हे आज दुपारी राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना भेटले. फडणवीस यांच्या या घोषणेने राजकीय वर्तुळाला धक्का बसला. आज केवळ एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार असे जाहीर करण्यात आले. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपचे १०६, शिंदे गट आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देण्यात आले.

मी बाहेर राहून सरकार चालवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन ,असे देवेंद्र फडवणीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे म्हणून सांगितले. त्यानंतर शपथविधीच्या अर्धा तास आधी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे जाहीर करण्यात आले.

एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द :

१९९७ व २००२ दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.

२००४, २००९, २०१४, २०१९ चार वेळा आमदार

२०१४ ते २०१९ विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते

१२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ विधानसभा विरोधी पक्ष नेता

५ डिसेंबर ते नोव्हेंबर २०१९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी २०१९ सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री

ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर २०१९ पासून शिवसेनेचे गटनेते

नोव्हेंबर २०१९ पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.

रिक्षाचालक ते थेट नगरसेवक -

सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आणि ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. काम करत असताना एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला दोन व्यक्तिंमुळे कलाटणी मिळाली. त्या व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे.

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या कामाला सुरुवात केली. पक्षाची कामं करताना शिंदेंना आनंद दिघेंचा सहवास लाभला आणि त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला. कालांतरानं एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागलं. पक्षाप्रतिची निष्ठा पाहुन एकनाथ खडसेंना त्यांच्या कामाची पावती मिळालीच. 1984 साली वयाच्या विसाव्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यावर आनंद दिघेंनी जबाबदारी सोपवली. ठाण्याच्या किसन नगरचं शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आलं. इथूनच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

फडणवीस यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद असल्याचे सांगत एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde)अभिनंदन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com