E Peek Pahani : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी

Kharif crop Registration : ई-पीक पाहणी नोंदणीला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील ४० हजार ६७९ शेतकऱ्यांनी १० हजार २९५ हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण केली आहे. ॲपमधील अडथळ्यांची शर्यत पार करीत शेतकऱ्यांनी ही नोंदणी केली आहे. ई-पीक पाहणी नोंदणीला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात ई-पीक पाहणी नोंदणीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कृषी विभाग, महसूल विभाग ई-पीक पाहणी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहे.

E Peek Pahani
E -Peek Pahani : ई -पीक पाहणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, शासनाकडून आकडेवारी समोर

दरम्यान ई-पीक पाहणी ॲपमध्ये काही दोष होते ते दूर करण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर नोंदणीला गती आली. महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायती, सहकारी संस्थाच्या माध्यमातून ई-पीक पाहणीकरिता शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येत आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : ई-पीकपेरा नोंदणी करण्यात शेतकऱ्यांना अडथळे

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ६७९ शेतकऱ्यांनी १० हजार २९५ हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली आहे. दरम्यान नोंदणीकरिता १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे नोंदणीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. कणकवली तालुक्यातील सर्वाधिक २ हजार ९६ हेक्टर क्षेत्राची नोंदणी ६ हजार ८६७ शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये) शेतकरी संख्या

कणकवली २ हजार ९६ ६ हजार ५६३

कुडाळ २ हजार ६९ ५ हजार ६६७

देवगड ९७७ ६ हजार ७५१

दोडामार्ग ४२१ २ हजार ४३७

मालवण १ हजार २७१ ४ हजार ७७५

वेंगुर्ले ६०६ ४ हजार ३९९

वैभववाडी १ हजार ३४६ ४ हजार ३३४

सावंतवाडी १ हजार ४६९ ४ हजार ४२३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com