E Peek Pahani : ई-पीकपाहणी ५७ लाख शेतकऱ्यांकडून पूर्ण

Kharif Season : राज्यात चालू खरिपात ५७ लाख शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी केली आहे. या पाहणीत सर्वाधिक सहभाग सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा असून सोयाबीनची ई-पीकपाहणीतील नोंदणी २९ लाख हेक्टरच्या पुढे गेली आहे.
E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon

Pune News : राज्यात चालू खरिपात ५७ लाख शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी केली आहे. या पाहणीत सर्वाधिक सहभाग सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा असून सोयाबीनची ई-पीकपाहणीतील नोंदणी २९ लाख हेक्टरच्या पुढे गेली आहे.

महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात ई-पीकपाहणी १५ ऑक्टोबरपर्यंत चालू राहील. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्या तरी त्या दूर केल्या जात आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचण आल्यास शेतकऱ्यांनी गोंधळल्या स्थितीत ई-पीकपाहणी टाळू नये.

अनेकवेळा सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड ई-पीकपाहणीत अडथळा आणतात. परंतु, तांत्रिक बिघाड दूर होतात. त्यानंतर ई-पीकपाहणी पुन्हा करता येते. आतापर्यंत ५७ लाख सहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

राज्यात २०० पेक्षा जास्त पिकांची ई-पीकपाहणी करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. अर्थात, पहिल्या दोन सर्वाधिक मोठ्या पिकांमध्ये सोयाबीन व कपाशीचा समावेश होतो.

E Peek Pahani
E Peek Pahani : ई-पीकपाहणीच्या नोंदणीत ‘सर्व्हर डाउन’ची अडचण

१५ सप्टेंबरपर्यंत राज्यात सोयाबीनची २९.१४ लाख हेक्टरवर तर कपाशीची १५.६७ लाख हेक्टरवर ई-पीकपाहणी झालेली आहे. त्याखालोखाल भात ७.७६ लाख हेक्टर, तूर ३.३६ लाख हेक्टर तर मक्याची नोंदणी ३.१८ लाख हेक्टरपर्यंत झाली आहे.

ई-पीकपाहणीसाठी व्हर्जन-दोन हे अद्ययावत उपयोजन (अॅप्लिकेशन) यंदा खुले केले गेले आहे. विशेष म्हणजे गेल्या हंगामात याच कालावधीच्या तुलनेत यंदा ई-पीकपाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण १० ते १५ टक्के जास्त आहे, असा दावा सरकारी यंत्रणेने केला आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : नांदेड जिल्ह्यात केवळ १६ टक्के क्षेत्राचीच ई-पीकपाहणी

सव्वा कोटी हेक्टरच्या पुढे ई-पीक पाहणीची शक्यता

पंतप्रधान पीकविमा योजनेत अर्ज दाखल करताना ई-पीकपाहणी सक्तीची करण्यात आलेली नाही. मात्र नुकसान भरपाईचा दावा निकाली काढताना समजा विमा कंपनीला पिकाच्या क्षेत्राबाबत शंका आली आणि त्यातून वाद उद्भवल्यास ई-पीकपाहणीचा आधार घ्यावा, असे शासनाने ठरविले आहे.

त्यामुळे यंदा शंभर टक्के ई-पीकपाहणी करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याचा वेग विचारात घेता अंतिम मुदतीपर्यंत राज्यभर अंदाजे सव्वा ते दीड कोटी हेक्टरपर्यंत ई-पीकपाहणी होण्याची शक्यता आहे, असे महसूल विभागातून सांगण्यात आले.

एका मोबाईल क्रमांकावरून १०० जणांची नोंदणी

दरम्यान, स्वतःच्या भ्रमणध्वनीवरुन ई-पीकपाहणी होत नसल्यास या प्रक्रियेपासून आपण वंचित राहू, अशी भीती बाळगू नये, असे महसूल विभागाचे म्हणणे आहे. कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून १०० जणांची पीकपाहणी करता येते.

त्यामुळे वैयक्तिक भ्रमणध्वनीला तांत्रिक समस्या असल्यास किंवा ई-पीकपाहणी कशी करावी हे लक्षात येत नसल्यास अशा शेतकऱ्याने गावातील कोणत्याही परिचित व्यक्तिची मदत घ्यावी. त्याच्या भ्रमणध्वनीच्या मदतीने ई-पीकपाहणी पूर्ण करता येते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com