Pesticide Sellers : कीटकनाशके विक्रेत्यांच्या अभ्यासक्रमाची मुदत वाढणार

देशात दीड लाख विक्रेत्यांचा अभ्यासक्रम बाकी
Pesticides
PesticidesAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः कीटकनाशके विक्रीसाठी (Sale of pesticides) बंधनकारक असलेल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची मुदत समाप्त झाली आहे. मात्र, देशातील दीड लाख विक्रेत्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही. यामुळे तयार झालेला पेच सोडविण्यासाठी अभ्यासक्रमांची मुदत वाढवून देण्याच्या हालचाली केंद्रात सुरू झाल्या आहेत.

विक्रेत्यांसाठी वर्षभर कालावधी असलेला हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सक्ती केंद्राने केली आहे. मात्र, त्यासाठी असलेली मुदत तोकडी होती व ती ३१ डिसेंबर २०२२ रोजी समाप्त झाली आहे.

त्यामुळे किमान दीड लाख विक्रेत्यांना अभ्यासक्रम पूर्ण करता आलेला नाही. प्रमाणपत्राविना कीटकनाशकांची विक्री केली म्हणून कायदेशीर पेच तयार होण्याची शक्यता आहे.

ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी ‘अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन’चे एक शिष्टमंडळ केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांना अलीकडेच भेटले.

Pesticides
Fake Pesticides : बनावट कीटकनाशके प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

अभ्यासक्रमाची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवून देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय या मागणीस अनुकूल असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. तसेच, गुणनियंत्रण विभागाकडून निविष्ठांबाबत कारवाई झाल्यानंतर चुकीने विक्रेत्यांवरच ठपका ठेवला जातो, अशी तक्रार मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

निविष्ठा उत्पादक कंपनी ऐवजी विक्रेत्यावर गुन्हे दाखल केले जातात. मुळात, निविष्ठा उत्पादनात विक्रेत्यांचा सहभाग नसतो. त्यामुळे निविष्ठांच्या कारवाईत विक्रेत्यांना आरोपी न करता केवळ साक्षीदार करावे, असा युक्तिवाद असोसिएशनकडून करण्यात आला. हा मुद्दा तपासून पाहिला जाईल, असे कृषी मंत्रालयाचे म्हणणे आहे.

Pesticides
Fertilizer Sellers Strike : खत विक्रेत्यांचा आजपासून बंद

परवानाधारक विक्रेत्याचा मृत्यू झाल्यास निविष्ठा विक्रीचा मूळ परवाना आपोआप वारसाच्या नावे केला जात नाही. त्यामुळे व्यवसाय बंद पडतो व त्यात गावातील शेतकऱ्यांची गैरसोय होते.

त्यामुळे परवाना देतानाच वारसाचे नाव नमुद करण्याची सुविधा देशभर द्यावी, असे असोसिएशनकडून सूचविण्यात आले आहे.

त्यासाठी बियाणे व कीटकनाशके अधिनियमांमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. हा मुद्दादेखील कृषी मंत्रालय तपासून बघणार आहे.

देशातील कीटकनाशकांची विक्री व्यवस्था सांभाळण्यात विक्रेत्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.

त्यासाठी केंद्र शासन अनुकूल असून अभ्यासक्रमाची मुदत वाढवली जाईल.
- मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com