Crop Damage : अस्मानी आणि सुलतानीमुळे रब्बी हंगाम पुरता उजाड होण्याची वेळ..!

राज्यात गेल्या सहा दिवसांपासून सतत होत असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे काही जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगाम पुरता उजाड होण्याची वेळ आली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Pune News ः राज्यात गेल्या सहा दिवसांपासून सतत होत असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे (Hailstorm) काही जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगाम (Rabi Season) पुरता उजाड होण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत २४ जिल्ह्यांमध्ये कुठे ना कुठे पिके नष्ट (Crop Damage) झाली आहेत.

त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना दुसऱ्या बाजूला निवृत्तिवेतनासाठी (Old Pension Scheme) आमचा संप सुरू असल्याने सोमवारी (ता. २०) दुपारी दोन वाजेपर्यंत पीक पंचनाम्यांना (Crop Damage Survey) सुरुवात झालेली नव्हती.

बाजारभाव नाही आणि नुकसान भरपाईदेखील नसल्याने यंदा प्रथमच शेतकऱ्यांवर ‘अस्मानी’ आणि ‘सुलतानी’ असे दुहेरी संकट आले आहे.

गेल्या चार मार्चपासून राज्यात वादळी पाऊस सुरू आहे. ४ ते ९ मार्च या पाच दिवसांत जवळपास १८ जिल्ह्यांमधील ४० हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली होती.

परंतु, त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १५ ते १९ मार्च दरम्यान वादळी पाऊस आणि गारपीट यामुळे एक लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांना तडाखा बसला. त्यामुळे आतापर्यंत दीड लाख हेक्टरवरील रब्बी पिके वाया गेल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनाम्यांचे गाडे अडून बसलेले आहे. दुसऱ्या बाजूला गारपिटीचा कहर थांबण्यास तयार नाही.

रब्बी गहू, हरभरा, फळभाज्या आणि पालेभाज्या, कांदा, द्राक्ष, केळी, संत्रा अशा पिकांना वादळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. राज्यात रोज कोणत्या तरी भागात अवकाळी पाऊस किंवा वादळी वाऱ्यासह गारपीट होते आहे.

त्यामुळे कापणीला आलेली रब्बी पिके वाया जात असून भाजीपालावर्गीय पिकांमध्ये सड वाढली आहे. कांदा आणि टोमॅटो उत्पादकांना तर प्रचंड आर्थिक फटका बसतो आहे.

Crop Damage
Crop Damage : गारपिटीने द्राक्ष बागांसह कांदा पिकाची दैना

उन्हाळा सुरू असताना गेल्या सात दिवसांपासून राज्यात अगदी पावसाळ्यासारखी स्थिती आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे, दिवसभर आभाळ, कुठे तुफान पाऊस तर कुठे तुफान गारपीट अशा विचित्र हवामानाला बळीराजा तोंड देत आहे.

वादळी पावसानंतर रात्री गारठा, दिवसा पुन्हा कडक ऊन आणि दुपारनंतर पुन्हा पाऊस किंवा गारपीट असे दुष्टचक्र सुरू झाले आहे. भर उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यांमधील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत तर दऱ्याडोंगरांमधील धबधबे वाहू लागले आहेत.

Crop Damage
Crop Damage : वादळी पाऊस, गारांचा खच, पिकांच्या नुकसानीत भर

गेल्या चार दिवसांत २४ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली झाली. गारपिटीच्या तडाख्यामध्ये अनेक गावे सापडलेली असली तरी नेमक्या कोणत्या गावांमध्ये गारपीट झाली किंवा नुकसान किती झाले याविषयी कोणतीही ठाम माहिती महसूल खात्याकडे नाही.

तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक या तीन क्षेत्रिय कर्मचारी वर्गाकडे पीक पंचनाम्याची जबाबदारी असते. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे क्षेत्रिय पातळीवर पंचनाम्याची बोंब आहे.

Crop Damage
Grape Crop Damage : कासेगावात सात हजार एकरांवरील द्राक्षे संकटात

विशेष म्हणजे पंचनामे करण्याची जबाबदारी असलेल्या कृषी, महसूल व ग्रामविकास खात्यातील कर्मचारी वर्ग बहुतांश शेतकरी कुटुंबातील आहेत.

शेतकरी संकटात असताना कर्मचाऱ्यांनी संप तात्पुरता मागे घेत पंचनामे, मदत वाटप ही कामे करण्याची गरज आहे, असे कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पंचनामे रखडलेले असताना अमरावती जिल्ह्यात सोमवारी (ता.२०) काही गावांमधील पिकांना वादळी पावसाचा तडाखा बसला.

चिखलदरा भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. नंदुरबार जिल्ह्यात तर कोणत्या ना कोणत्या भागात गेल्या सहा दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीट चालू असल्यामुळे शेतकरी भांबावले आहेत.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार दिवसांत एकट्या नांदेड जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झालेली आहेत. अवकाळी पावसाने लातूरला ११ हजार हेक्टर, जालना जिल्ह्यात १५ हजार हेक्टर तर बीड जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाल्याचा अंदाज आहे.

चार दिवसांत रब्बी पिकांचे जिल्हानिहाय अंदाजे नुकसान

(सर्व आकडे हेक्टरमध्ये)

ठाणे ११७, रायगड २०७, नाशिक १२०, धुळे ८६१, नंदुरबार ६१, जळगाव ५६३, अहमदनगर ८०२१, पुणे ४८४, सोलापूर ३९६४, सातारा ४८४, छत्रपती संभाजीनगर १९४, बीड ११३०७, जालना १५०८०, नांदेड २३१८०, परभणी २४००, लातूर ११७९५, हिंगोली ५६०४, अमरावती १५१७, यवतमाळ ६५३९, बुलडाणा २३७२, वाशीम ४५०६, अकोला ५२८.

(*ही आकडेवारी अंदाजे व प्राथमिक असून कर्मचारी संपामुळे नुकसानीची निश्चित माहिती सरकारी कार्यालयांकडे उपलब्ध झालेली नाही.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com