Drought Conditions : अर्ध्या नागपूर जिल्ह्यात दुष्काळ सदृशस्थिती

सहा तालुक्यांतील संपूर्ण गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असून सहा गावांची पैसेवारी ५१ पेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अर्ध्या जिल्ह्यात दुष्काळ सदृशस्थिती आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

नागपूर : सहा तालुक्यांतील संपूर्ण गावांची पैसेवारी (Paisewari) ५० पेक्षा कमी असून सहा गावांची पैसेवारी ५१ पेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अर्ध्या जिल्ह्यात दुष्काळ सदृशस्थिती (Drought Conditions) आहे.

शेतकऱ्यांवरील संकट (Farmers In Crisis) काही कमी होताना दिसत नाही. खरीप हंगामात (Kharif Season) कापूस चांगला होतो, तर सोयाबीन (Soybean) होत नाही. दोन्ही पीक चांगले झाले, तर भाव मिळत नाही.

यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. यावर्षी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

केंद्राच्या पथकाकडून नुकसानीची पाहणी झाली. पथकाने नुकसान झाल्याचे मान्य केले. केंद्राकडून मदत मिळाली.

राज्य शासनाने मदतीच्या रकमेसोबत हेक्टरची मर्यादाही वाढविली. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल, अशी आशा होती. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर प्रथम अनेकांकडून आक्षेप घेण्यात आले.

प्रत्यक्ष मदतीच्या वेळी प्रशासनाने शेतकऱ्यांची पिके ओलित ऐवजी कोरडवाहू दाखविली. त्यामुळे त्यांना कमी मोबदला मिळाला.

कापूस व सोयाबीनच्या भावातही घट झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासनाकडून खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर करण्यात आली.

नागपूर जिल्ह्याची स्थिती बिकट आहे. जिल्ह्यातील १ हजार ७८२ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. यातील ९१७ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे.

Rabi Sowing
Soybean Market: अर्जेंटीनातील दुष्काळ सोयाबीनला आधार देईल का? 

सहा तालुक्यातील संपूर्ण गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी तर सहा गावांची पैसेवारी ५१ पेक्षा अधिक दाखविण्यात आली. मौदा तालुक्यातील १०२ गावांपैकी ७ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी दाखविण्यात आली.

५० पेक्षा कमी पैसेवारी असलेले तालुके - हिंगणा, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, उमरेड.

५० पेक्षा जास्त पैसेवारी असलेले तालुके - ग्रामीण कामठी, रामटेक, पारशिवणी भिवापूर, कुही

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com