मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोवर डॉ. अशोक ढवळे

कन्नूर, केरळ येथे २३ वे राष्ट्रीय महाअधिवेशन
Ashok Dhawale
Ashok DhawaleAgrowon
Published on
Updated on

कन्नूर, केरळ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (Marxist Communist Party) २३व्या राष्ट्रीय महाअधिवेशनात निवडलेल्या नवीन केंद्रीय कमिटीने अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय (All India Kisan Sabha)अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे (Dr. Ashok Dhawale) यांची पक्षाच्या १७ सदस्यांच्या नवीन पॉलिटब्युरोवर निवड केली आहे.
कन्नूर, केरळ येथे झालेल्या पक्षाच्या या महाअधिवेशनाने महाराष्ट्रातून पुढील आणखी ३ सदस्यांची ८५ सदस्यांच्या नवीन केंद्रीय कमिटीवर निवड केली आहे. किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष व यापूर्वी ७ वेळेस निवडून आलेले आमदार जे. पी. गावित, (MLA J. P. Gavit) अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, पक्षाचे नवीन महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. उदय नारकर (Dr. Uday Narkar) यांची निवड केली आहे.

Ashok Dhawale
जागतीक बाजारात गहू, मका, सूर्यफूल तेल महागले

पक्षाचे माजी महाराष्ट्र राज्य सचिव आणि ‘सीटू’चे राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम (Narasaya Adam) हे ७५ वर्षांच्या वयाच्या अटीमुळे या महाअधिवेशनात केंद्रीय कमिटीमधून सन्मानाने निवृत्त झाले. डॉ. अशोक ढवळे हे माकपच्या पॉलिटब्युरोवर महाराष्ट्रातून निवडून आलेले तिसरे नेते आहेत. यापूर्वी पक्षाचे एक ‘नवरत्न’ आणि सीटूचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बी. टी. रणदिवे आणि सीटूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम. के. पंधे हे पक्षाच्या पॉलिटब्युरोचे अनेक वर्षे सदस्य होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com