Jalgaon News : आत्महत्या करू नका, जोडव्यवसाय करा

आजही आदिवासी भागातील नागरिक एक ते दीड किलोमीटर अंतराहून डोक्यावरून पाणी आणून निरोगीजीवन जगत आहे.
Jalgaon News
Jalgaon NewsAgrowon

अमळनेर, जि. जळगाव : शेतीसाठी लागणारा खर्च वाढला, परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे (Farmer Suicide) प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीसोबतच जोड व्यवसाय (Business) करावा, असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे (Padmashri Rahibai Popere) यांनी केले.

येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यशाळेत पोपेरे बोलत होत्या.

जिल्हा कृषी अधिकारी प्रा. संभाजी ठाकूर, सुखदेव भोसले, आहार तज्ज्ञ डॉ. अनिल पाटील, डॉ. अपर्णा मुठे, प्रा. वसुंधरा लांडगे, गायत्री म्हस्के, अनिल भोकरे, सुबोध पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्थ जयश्री साबे, दादाराम जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पोपेरे म्हणाल्या, की आदिवासी समाजाने खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. रानभाज्या व पारंपरिक धान्य संस्कृती टिकून आहे.

आजही आदिवासी भागातील नागरिक एक ते दीड किलोमीटर अंतराहून डोक्यावरून पाणी आणून निरोगीजीवन जगत आहे.

पुढची पिढी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी आतापासून कामाला लागले पाहिजे. योगेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दीपक चौधरी यांनी आभार मानले.

मला मातीमुळेच पुरस्कार

लहान वयातच डोक्यावरून मातृछत्र हरपले. वडिलांनी आम्हा सात बहिणींचा सांभाळ केला. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दोन बहिणी शिक्षित झाल्या तर चार अशिक्षित राहिल्या.

वडिलांच्या संस्काराची शिदोरी सोबत असल्याने आज तुमच्यासमोर मार्गदर्शन करू शकले. गरिबीमुळे शाळेत गेली नाही, पण कृषी पदवी घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांना मार्गदर्शन करत आहे.

‘पद्मश्री’सह अनेक पुरस्कार मला केवळ काळ्या मातीमुळे मिळाले. प्रत्येक गावातील महिलेने पारंपरिक पद्धतीने देशी वाणांचे जतन करावे.

Jalgaon News
Rahibai Popere : बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे भाषण रोखले

माहेरी आल्यासारखे वाटले

रेती, माती व शेतीचे आराध्य दैवत असलेल्या मंगळ देवाच्या दर्शनाने भारावून गेली आहे. आजवर अनेक ठिकाणी जाऊन महिलांना मार्गदर्शन केले.

परंतु आज कार्यक्रमात नारीशक्तीचा प्रचंड उत्साह दिसला. ही बाब कौतुकास्पद आहे. मंदिराचा परिसर पाहून माझ्या माहेरीच आल्यासारख वाटले, असेही पद्मश्री पोपेरे म्हणाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com