Fruits Vegetables Exports : फळे, पालेभाज्या, निर्यातीसाठी राज्य सरकारच्या मॅग्नेट प्रोजेक्टविषयी माहिती आहे का? असा कराल अर्ज

State Government : राज्य सरकारकडून फळे, भाजीपाला व फुलांचे उत्पादनाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी मॅग्नेट प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे.
Fruits Vegetables Exports
Fruits Vegetables Exportsagrowon
Published on: 
Updated on: 

Fruits Vegetables Exports Magnet Project : राज्य सरकारकडून फळे, भाजीपाला व फुलांचे उत्पादनाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी मॅग्नेट प्रोजेक्ट राबवण्यात आला आहे. दरम्यान या प्रोजेक्टमुळे मुल्य साखळी विकसीत करणे व त्यात खाजगी गुंतवणूकदार आकर्षित करण्याचा मुख्य उद्देश असणार आहे. याचबरोबर पीक काढल्यानंतर बऱ्याच वेळा नुकसान होते, तसेच साठवणुकीची क्षमता वाढविणे हा या प्रोजेक्टचा मुख्य हेतू असणार आहे.

या मॅग्नेट प्रकल्पाचा कालावधी ६ वर्षाचा असून तिसऱ्या टप्प्यासाठी याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने www.msab.com या वेबसाईटवर लिंक देण्यात आलेली आहे.

दरम्यान अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष, विहीत नमुन्यातील अर्ज, मुल्यांकन निकष व कागदपत्रांची चेकलिस्ट, या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून चेकलिस्टप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून मॅग्नेट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पी.आय. यू) तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, श्री छत्रपती शाहू मार्केट यार्ड, विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे छापील प्रतीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम (ता.१०) ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे, याबाबत विभागीय प्रकल्प उपसंचालक, मॅग्नेट प्रकल्प पी.आयु. यू. कोल्हापूर डॉ. सुभाष घुले यांनी माहिती दिली.

Fruits Vegetables Exports
SMART Project : शेतकरीकेंद्रित सुविधांवर बाजार समित्यांनी भर द्यावा

असे असतील पात्र लाभार्थी

दरम्यान यातील पात्र लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था (कंपनी कायदा व सहकारी संस्था कायदा) या अंतर्गत नोंदणी करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी संस्था, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत प्रोत्साहित प्रभाग संघ याचबरोबर महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे प्रोत्साहित लोकसंचलित साधन केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन असोशिएशन्स) यांचा समावेश असणार आहे.

याचबरोबर मुल्यसाखळी गुंतवणुकदार (शेतकरी उत्पादक कंपनी नसलेल्या मात्र, कोणत्याही फलोत्पादन पिकांच्या उत्पादकाबरोबर तसेच उत्पादकांच्या सहकारी संस्थांबरोबर सक्रियपणे कामकाज करत असलेल्या संस्था जसे अॅग्रीगेटर / प्रक्रियादार/निर्यातदार / मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था / कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था) यांचा समावेश आहे.

मॅग्नेट प्रकल्पातील पहिल्या दोन टप्प्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व लोकसंचलित साधन केंद्र यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला होता.

या फळांचा आहे समावेश

तिसऱ्या टप्प्यात मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत केळी, पेरू, डाळिंब, चिक्कू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची (हिरवी / लाल) व फुलपिके या अगोदरच्या ११ पिकांसह नवीन चार पिकांचा (आंबा, काजू, लिंबू आणि पडवळ) यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com