Crop Damage Survey : पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करा

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार, असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
Crop Panchnama
Crop PanchnamaAgrowon

धुळे ः तालुक्यातील नेर, कुसुंबा, देऊर, मोराणे प्र. ल. परिसरात अवकाळी पावसामुळे (Avakali Pauas) पिकांचे नुकसान झाले. महसूल, कृषी विभागाने (Agricultural Department) या नुकसानीचा तातडीने पंचनामा (Panchnama) करून तसा प्रस्ताव शासनास सादर करावा.

तसेच विमा कंपनीनेही या बाबत त्वरित आढावा घेऊन विमा भरपाई देण्याच्या सूचना आमदार पाटील (MLA Patil) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार, असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

या नुकसानीचे तातडीने पंचनामा करून तसा प्रस्ताव शासनास पाठवावा, अशा सूचना आमदार कुणाल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

३० जानेवारीला सायंकाळी धुळे तालुक्यात काही भागांत अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

Crop Panchnama
Chana Market : बदलते वातावरण, पावसामुळे हरभऱ्याचे नुकसान वाढले

गव्हाचे पीक संपूर्णपणे भुईसपाट झाले असून, कांदा, हरभरा, तसेच इतर फळपिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून नेल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com