Yavatmal DCC Banck : थकित कर्जावरून जिल्हा बॅंक देणार आठ हजारांवर शेतकऱ्यांना नोटिसा

कापूस व इतर शेतमालाचे दर दबावात आहेत. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री थांबविली असतानाच आता थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने कलम १०१ अंतर्गंत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.
Yavatmal DCC Bank
Yavatmal DCC Bank Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News कापूस व इतर शेतमालाचे दर (Cotton Rate) दबावात आहेत. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री थांबविली असतानाच आता थकीत कर्जाच्या (Loan Due) वसुलीसाठी जिल्हा बॅंकेने (Yavtmal DCC Bank) कलम १०१ अंतर्गंत नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात शेतकऱ्यांमधून तीव्र रोष व्यक्‍त केला जात आहे.

गेल्या हंगामात शेतकऱ्यांना संततधार पावसापासून पिकाचा बचाव करताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. पावसामुळे कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकता प्रभावित झाली.

त्यातच गेल्या हंगामाप्रमाणे यंदाही शेतमालाला चांगले दर मिळतील आणि उत्पादकतेमधील तूट भरून निघेल, ही आशा असताना शेतमालाचे दर दबावात असल्याने शेतकऱ्यांचे ते स्वप्नही धुळीस मिळाले.

Yavatmal DCC Bank
Crop Loan : तगादा नको, दिलासा द्या

अशा स्थितीत आता जिल्हा बॅंकेकडून कर्ज वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या ४० हजारावर सभासदांकडे ४५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील आठ हजारावर शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षात एक रुपयांचाही परतावा केला नाही. यामुळे अशा थकबाकीदार शेतकऱ्यांवर सहकार कायद्यातील कलम १०१ अंतर्गंत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Yavatmal DCC Bank
Rabi Crop Loan : पुणे जिल्हा बँकेकडून रब्बीत ४२४ कोटींचे पीककर्ज वितरण

या संदर्भात सेवा सोसायटींना सूचना देणात आल्या असून, त्यानुसार कार्यवाहीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी ठरावीक कालावधीनंतर कर्जाची परतफेड न केल्यास बॅंकेचे एनएपी खातेधारक वाढतात.

यातून बॅंका अडचणीत येण्याचा धोका असतो. मार्च अखेर होण्यापूर्वीच बॅंकांनी कर्जवसुलीसाठी कंबर कसली आहे. उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, थकीत कर्जदारांना वसुलीसाठी नोटीस बजावल्या जाणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com