Parbhani News : परभणीत केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रोख रक्कम

याअंतर्गत परभणी जिल्ह्यात मार्चअखेर ४९ हजार ९८१ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी असून, २ लाख १८ हजार ९०४ लाभार्थी आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली.
Crop Loan
Crop LoanAgrowon

Parbhani News : राष्ट्रीय अन्नसुरक्षा (Food Security) अभियानांतर्गत परभणीसह राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर यंदाच्या जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्याला आता अन्नधान्याऐवजी प्रति व्यक्ती १५० रुपये रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे.

याअंतर्गत परभणी जिल्ह्यात मार्चअखेर ४९ हजार ९८१ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी असून, २ लाख १८ हजार ९०४ लाभार्थी आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली.

यापूर्वी केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे दर महिन्याला प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्य (गहू प्रति किलो २ रुपये आणि तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये या दराने) अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. तथापि, भारतीय अन्न महामंडळाकडून गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने जानेवारी २०२३ पासून अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट खात्यावर जमा होणार आहे.

Crop Loan
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांना आता दुप्पट मदत नाही

परभणी जिल्ह्यातील शेतकरी योजनेच्या लाभासाठी ‘आरसीएमएस’वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकांनी डीबीटीसाठी आवश्यक असलेला बँक खात्याचा विहित नमुन्यातील फॉर्म संबंधित तहसिल कार्यालय (पुरवठा विभाग) येथून घ्यावा.

हा फॉर्म ऑफलाइन भरून अर्जासोबत महिला कुटुंब प्रमुखाच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्डच्या पहिल्या पानाची प्रत, सर्व सदस्यांच्या आधारकार्डची प्रत व विहित नमुन्यातील फॉर्म संबंधित स्वस्तधान्य दुकानदार यांच्याकडे तत्काळ जमा करावेत.

Crop Loan
Crop Loan : पीककर्जाची रक्कम शेतकऱ्यांना रोखीने मिळेना

कुटुंबातील काही सदस्य मयत व मुलींचे लग्न होऊन कायम स्थलांतर झाले असल्यास दुकानदारांना ही नावे वगळण्यास कळवावे व फॉर्मवर एकूण सदस्य संख्या लिहून फॉर्म जमा करावा.

या योजनेअंतर्गत वितरित करावयाची रोख रक्कम महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

पात्र शिधापत्रिकाधारक महिला कुटुंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास महिलांनी नवीन बँक खाते सुरू करावे. लाभार्थ्यांनी तो फॉर्म व आवश्यक बँक खाते व कागदपत्रे मुदतीत संबंधित स्वस्तधान्य दुकानदार कार्यालयात जमा न केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. असे सांगण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com