Banana : सांगली जिल्ह्यात केळीच्या क्षेत्रात घट

तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना विषाणूमुळे बाजारपेठा बंद असल्याचा फटका केळी उत्पादकांना बसला. त्यातून अद्याप केळी उत्पादक शेतकरी सावरला नाही.
Banana
Banana Agrowon

सांगली ः तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना विषाणूमुळे बाजारपेठा (Market) बंद असल्याचा फटका केळी (Banana ) उत्पादकांना बसला. त्यातून अद्याप केळी उत्पादक शेतकरी सावरला नाही. त्यातच सातत्याने केळीच्या दरात होणारी घसरण या साऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून जिल्ह्यात केळीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे.

Banana
Orange Crop Insurance: संत्रा उत्पादकांचे आज मंथन बैठक

२०१९-२० मध्ये जिल्ह्यात सुमारे ९३० हेक्टरवर केळी लागवड होती. २०२१-२२ मध्ये ६७६ हेक्टरवर लागवड असून तीन वर्षांत २५४ हेक्टरने लागवड घटली आहे.सांगली जिल्ह्यात केळी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मुळात मिरज, वाळवा तालुक्यांत प्रामुख्याने केळीचे उत्पादन घेतले जाते.

स्थानिक बाजारपेठेसह केळीची निर्यातही करण्यासाठी केळी उत्पादक शेतकरी पुढाकार घेतो. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात ९३० हेक्टरवर केळीची लागवड होती. २०२० मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद होत्या. ऐन हंगामात बाजारपेठा बंद असल्याने केळीची विक्री कुठे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. दरम्यानच्या काळात दोन ते तीन रुपये प्रति किलो असा दर मिळाला. या साऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमले.

त्यातच महापूर, अतिवृष्टी यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे पाठ फिरवण्यास प्रारंभ केला. त्यातूनही केळीला चांगले दर मिळतील या हेतुने खानापूर, तासगाव, वाळवा तालुक्यांत शेतकऱ्यांनी पुन्हा जोमाने लागवड सुरू केली. केळीचे दर्जेदार उत्पादन मिळू लागले.

Banana
Crop Protection : ट्रायकोडर्मा वापरण्याच्या विविध पद्धती कोणत्या?

परंतु बाजारपेठेतील केळीची मागणी आणि आवक कमी अधिक होऊ लागली. याचा परिणाम दरावर होण्यास सुरुवात झाली. सध्या सांगलीतील केळीला प्रति किलोस ९ ते १० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सातत्याने दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील केळीच्या लागवडीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद असून दुसऱ्या पिकांना प्राधान्य मिळत आहे.

केळीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सध्या स्थानिक बाजारपेठेत केळीला प्रति किलोस दहा रुपये दर आहे; मात्र, केळीस प्रति किलो १० रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला तर केळी पीक परवडेल.

- जयवंत मोहिते, केळी उत्पादक शेतकरी, मोहित्याचे वडगाव, ता. कडेगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com