Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री फडणवीसांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द, चर्चांना उधाण

Latest Political News Maharashtra : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता.१३) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार होते. कोल्हापुरात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार असल्याने मोठी तयारी करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Agrowon
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता.१३) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार होते. कोल्हापुरात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार असल्याने मोठी तयारी करण्यात आली आहे. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आज राज्यातील सर्व वर्तमानपत्रांना शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द झाल्याने तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “अरे.. तुम्ही तेच ते प्रश्न ?” पत्रकाराच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला फडणवीसांचे उत्तर; म्हणाले, “सप्लाय वाढल्याने…”

दरम्यान, याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना खुलासा केला आहे. ते म्हणाले, `` राज्यात भाजप -शिवसेना युतीची सत्ता आहे. मागच्या काही दिवसांपासून आमच्यात धुसफूस असल्याचे बोलले जात आहे. परंतु अशी कोणतीही परिस्थिती नाही.

Devendra Fadnavis
Seed Black Market : वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करा ; मुख्यमंत्र्यांचे आदेश

उपमुख्यमंत्री फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. परंतु त्यांना कानाचा त्रास सुरू झाल्याने डॉक्टरांनी त्यांना हवाई प्रवास टाळायला सांगितले आहे. त्यामुळे त्यांचा दौरा रद्द झाला.`` तसेच आज सर्व वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या जाहिरातीमध्ये काही चुकीचे असेल तर दुरूस्ती केली जाईल, यात कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

राज्यातील अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रात शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीतून फडणवीस यांचा फोटो गायब आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने भाजपला संदेश दिल्याचे मानले जात आहे. या जाहिरातीमुळे भाजप- शिवसेनेतील तणाव वाढला असल्याचे बोलले जात आहे. जाहिरीतीवरून निर्माण झालेल्या वादामुळेच फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यासमवेत कोल्हापुरला येण्याचे टाळल्याची चर्चा आहे.

छगन भुजबळ यांची टीका

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाची जाहिरात पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. यावेळी भुजबळ म्हणाले की, पूर्वी शिंदेंच्या जाहिरातीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असायचे. दोघांचे एकत्र फोटो लावले जायचे. परंतु ही जाहिरात पाहून मला आश्चर्य वाटले. पूर्वी फडणवीसांचा फोटो असायचा परंतु यावेळी फडणवीस एकदम गायब झाले. तसेच त्यांच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो नाही, त्यामुळे मला आश्चर्य वाटले, असे भुजबळ म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com