Washim Forest Fire
Washim Forest FireAgrowon

Forest Fire : वणव्याने वनसंपदेचे नुकसान

वनविभागाकडून वणव्याबाबत कुठल्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. वनविभागाने संभाव्य धोके लक्षात घेता योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

Washim Fire News : तालुक्यातील वनोजा येथील प्रादेशिक जंगलाला वनोजा बीट परिसरात गुरुवारी (ता. दोन) दुपारी दुसऱ्यांदा भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये वनसंपदेचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळताच पथकाचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Washim Forest Fire
Forest Fire : वणवे पेटविणे धोकादायक, अन्‌ कायदेशीर गुन्हाही!

तसेच घटनेची माहिती वनविभागाला (Forest Department) देऊन झाडाच्या फांद्यांच्या साहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. यानंतर वनविभागाचे कर्मचारीही दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

या आगीत (Washim Fire) जवळपास ५ ते ७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. यामध्ये सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र वनसंपदेचे नुकसान झाले. वनविभागाने वनवणव्याबाबत जंगलालगतच्या गावांमध्ये व्यापक जनजागृती करणे, जंगलालगत फायर लाईन करणे गरजेचे असते.

Washim Forest Fire
वणवा रोखण्यासाठी १५० गावांत जनजागृती सुरू

मात्र, याकडे प्रादेशिक वनविभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी हे आपल्या बीटचा कारभार शहरांमध्ये राहून पाहतात.

वनविभागाकडून वणव्याबाबत कुठल्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. वनविभागाने संभाव्य धोके लक्षात घेता योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी महाविद्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रवीण गावंडे, आदित्य इंगोले तसेच सचिन राठोड, पुनेश राठोड आदींनी पुढाकार घेतला.

वनोजा येथील प्रादेशिक जंगलाला दुसऱ्यांदा वणवा लागला. याआधी २३ जानेवारीला अकोला- मंगरूळपीर मार्गालगत आग लागली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com