White Onion : नेरळमध्ये फुलला पांढरा कांदा

जीआय मानांकन मिळालेला अलिबागचा पांढरा कांदा वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. चवीला अन्य कांद्यापेक्षा गोड, टिकाऊ अशी त्याचे वैशिष्ट्ये आहेत.
White Onion
White OnionAgrowon

दीपक पाटील

नेरळ : भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या कर्जत तालुक्यात (Paddy Hub) आजही शेती केली जाते. विविध क्षेत्रांत पुढे असणारा हा कर्जत तालुका शेतीतही कायम अग्रेसर आहे.

येथील शेतकरी अनेक प्रयोग करताना दिसतात. अशातच राजकारणात पारंगत असलेले नेरळमधील अंकुश शेळके यांनी आपल्या शेतात वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी पांढऱ्या कांद्याचे पीक (White Onion Crop) घेतले आहे.

जीआय मानांकन मिळालेला अलिबागचा पांढरा कांदा (Alabaug white Orange) वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. चवीला अन्य कांद्यापेक्षा गोड, टिकाऊ अशी त्याचे वैशिष्ट्ये आहेत.

महिलांकडून कुशलतेने या कांद्याची माळ किंवा वेणी केली जाते. ती प्रसिद्धही आहे. अलिबाग भागातील हे पारंपरिक बियाणे आहे.

भातकाढणीनंतर दोन महिन्यांच्या कालावधीत ओलाव्याच्या आधारे हा कांदा लावण्यात येतो. अलिबागहून येताना प्रत्येक जण हा कांदा आवर्जून खाण्यासाठी घेऊन येतो.

या कांद्याचे महत्त्व लक्षात घेऊन नेरळ येथील अंकुश शेळके यांनी याची लागवड आपल्या शेतात करण्याचे ठरवले. नेरळजवळील कुंभे येथे त्यांची शेती आहे.

त्यासाठी अलिबाग चोंढी येथे संपर्क साधून त्यांनी पांढऱ्या कांद्याची रोपे स्वतः जाऊन आणली. २० गुंठे जागेत योग्य पद्धतीने लागवड करून पाण्याचे नियोजनही तसे केले. कारण त्याचे कंद जमिनीच्या आत असते.

White Onion
Onion Arrival : उन्हाळ कांदा आवक संपुष्टात
मी सुरुवातीपासून खूप मेहनत केली आहे. वेणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शेरण्यांपासून आमची सुरुवात आहे. त्यामुळे शेतीची आवड कायम होती. मोगरा शेती उत्पन्न देणारी होती; मात्र पुरात ती गेल्याने आता पांढरा कांद्याचा प्रयोग केला आहे. तो यशस्वी झाला आहे. अजूनही काही नावीन्यपूर्ण शेतीचे प्रयोग करण्याचा मानस आहे.
अंकुश शेळके, प्रयोगशील शेतकरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com