Watermelon Cultivation : अकोल्यात कलिंगड, खरबुजाची लागवड सुरू

उन्हाळ्यात कलिंगडाची मागणी राहते. या काळात दरही चांगला मिळतो. मागील दोन हंगामात कोरोनामुळे मार्केटिंग, विक्रीला अडथळे आले होते.
Watermelon
WatermelonAgrowon
Published on
Updated on

अकोला ः जिल्ह्यात प्रयोगशील शेतकरी कमी कालावधीच्या पिकांकडे वळाले असून उन्हाळ्याच्या तोंडावर कलिंगड, खरबूज (Watermelon Cultivation) ही दोन पिके आता अधिक क्षेत्रावर घेतले जात आहेत. सिंचनाची (Irrigation) सोय असलेल्या पट्ट्यात या हंगामाची लागवड सुरू झाली आहे. तेल्हारा तालुक्यात मल्चिंगवर कलिंगड, खरबूज लागवड सुरू झाली आहे.

Watermelon
Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड वाढणार

या तालुक्यात उन्हाळ्यात कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात. दोन्ही पिके उन्हाळी हंगामात दरवर्षी मोठ्या क्षेत्रावर घेतल्या जाऊ लागली आहेत. उन्हाळ्यात कलिंगडाची मागणी राहते. या काळात दरही चांगला मिळतो. मागील दोन हंगामात कोरोनामुळे मार्केटिंग, विक्रीला अडथळे आले होते. आता परिस्‍थिती बदलली असून शेतकरी चांगला दर मिळेल या आशेने कलिंगड, खरबूज लागवडीकडे वळाले आहेत.

Watermelon
Watermelon Cultivation : कलिंगड पिकाच्या लागवडीकडे कल

तेल्हारा तालुक्यात हिंगणी बुद्रुक येथे शेतकरी सचिन कोरडे यांच्या शेतात कलिंगड लागवड सुरु झाली असताना तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड, कृषी सहायक महेश इंगळे यांनी भेट देवून पिकाचे व्यवस्थापन, लागवड पद्धत, पाणी व्यवस्थापनाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी राठोड यांनी यांनी, कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड करताना विविध गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरचा वापर करावा असेही ते म्हणाले.

हंगाम साधण्याची आशा

मागील दोन-तीन हंगामात कलिंगडाचे पीक जेमतेम राहिलेले आहे. आधी कोरोनाचा फटका बसला. त्यानंतर वातावरण बदलानेही पिकाचे नुकसान केले होते. तरीही या हंगामात शेतकरी जोमाने कलिंगड लागवडीसाठी तयारी करीत आहेत.

कमी कालावधीचे हे पीक दर मिळाले तर चांगले पैसे मिळवून देते. मात्र, दर न मिळाल्यास लागवड खर्चही निघणे अवघड जाते. मागील कटू अनुभव विसरून शेतकरी नव्या हंगामाच्या तयारीला लागलेले आहेत. हा हंगाम चांगले पैसे देईल अशी अपेक्षा बाळगून आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com