Sugarcane Cultivation : पुणे जिल्ह्यात उसाची ९३ हजार हेक्टरवर लागवड

जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र एक लाख १७ हजार ७१ हेक्टर क्षेत्र आहे. सरासरीच्या तुलनेत विचार केल्यास चालू वर्षी उसाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी घट झाली आहे.
Sugarcane cultivation
Sugarcane cultivationAgrowon

Sugarcane Farming पुणे ः जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ३४४ हेक्टरवर ऊस लागवडी (Sugarcane Cultivation) झाल्या आहेत. साखर कारखाने (Sugar Mill) बंद होण्यास अजून एक ते दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहेत, त्यामुळे या क्षेत्रात काही प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र एक लाख १७ हजार ७१ हेक्टर क्षेत्र आहे. सरासरीच्या तुलनेत विचार केल्यास चालू वर्षी उसाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी घट झाली आहे.

मात्र, साखर कारखाने सुरू असल्याने अनेक शेतकरी खोडवा पिकाचे संगोपन करीत असल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ होते.

यंदाही या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून साखर कारखाने बंद होण्यास अजून एक ते दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे या क्षेत्रात काही प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Sugarcane cultivation
Sugarcane Harvesting : सिंधुदुर्गात १५ हजार टन ऊसतोडणी शिल्लक

उशिरा पडलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील उजनी, खडकवासला, डिंभे, पानशेत यांसह अनेक धरणांत पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. मात्र, इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात.

त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात. यंदा जून, जुलै महिन्यांत पावसाचा थोड्याफार प्रमाणात खंड पडला असला तरी अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला.

त्यामुळे ऊस लागवडी खोळंबल्या होत्या. परंतु ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीवर भर दिला. परिणामी ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे.

Sugarcane cultivation
Sugarcane Crushing : मंगळवेढ्यात साडेसोळा लाख मे. टन उसाचे गाळप

दर वर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तीन हंगामात उसाच्या लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यात आडसाली उसाची लागवड शेतकरी करतात.

लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात.

पुणे जिल्ह्यातील दौड, हवेली, शिरूर, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर या तालुक्यांतही लागवडी झाल्या आहेत. मुळशी, मावळ, वेल्हे, खेड हे तालुके उसाच्या लागवडीपासून दूर आहेत.

तालुकानिहाय आडसाली उसाच्या झालेल्या लागवडी (क्षेत्र, हेक्टरमध्ये) ः

तालुका ---- सरासरी क्षेत्र --- ऊस लागवड

हवेली -- ६२८१ -- ७३५५

मुळशी -- ८४२ -- ०

भोर -- १३७६ -- १३३२

मावळ -- १८६३ -- २२२

वेल्हे -- २८४ -- ०

जुन्नर -- ८९४१ -- ४६४८

खेड -- ३३९६ -- १९४९

आंबेगाव -- ४७६६ -- ४५०९

शिरूर -- २०,७४० -- २२,७५३

बारामती -- १८,०८७ -- १६,४१५

इंदापूर -- ३१,५४१ -- ८४७४

दौड -- १६,३३३ -- २२,९०९

पुरंदर -- २६२३ -- २७७८

एकूण -- १,१७,०७१ -- ९३,३४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com