Sugarcane Cultivation : माजलगाव तालुक्यात १८ हजार हेक्टरवर नवीन उसाची लागवड

मागील चार वर्षांपासून चांगला होत असलेला पाऊसकाळ यामुळे तालुक्याच्या सिंचन क्षेत्रात कमालीची वाढ झाली असून, सिंचन क्षेत्र ७० टक्क्यांवर गेले आहे.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon

Sugarcane Cultivation माजलगाव, जि. बीड : ऊसगाळपासाठी (Sugarcane Crushing) होत असलेली परेशानी, तसेच ऊसतोड (Sugarcane Harvest) मजुरांची करावी लागणारी मनधरणी असे असले, तरी माजलगाव तालुक्यात नव्याने १७ हजार ८३१ हेक्टरवर उसाची लागवड (Sugarcane Cultivation) झाली आहे. याशिवाय पुढील गाळप हंगामात १२ हजार १४५ हेक्टर एवढा खोडवाही गाळपास उपलब्ध होणार आहे.

मागील चार वर्षांपासून चांगला होत असलेला पाऊसकाळ यामुळे तालुक्याच्या सिंचन क्षेत्रात कमालीची वाढ झाली असून, सिंचन क्षेत्र ७० टक्क्यांवर गेले आहे. धरणाच्या पाण्याचाही उसाला लाभ मिळत आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation : खानदेशात ऊस लागवड स्थिर

मागील तीन ते चार वर्षांपासून पाऊस चांगला होत असल्याने धरणही तीन ते चार वर्षांपासून भरत आहे.

शेती सिंचनासाठी रब्बी हंगामात चार, तर उन्हाळी हंगामात तीन, अशी एकूण सात आवर्तने दरवर्षी धरणातून मिळत असल्याने कॅनॉलशेजारील विहीर, विंधन विहीर या जलस्रोतांमध्ये चांगली पाणीपातळी राहते आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation : वर्धा जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात घट

तर कापूस, सोयाबीनसह खरिपातील इतर पिकांना वातावरणातील बदलाचा मोठा फटका बसतो. उसाला मात्र अल्पप्रमाणातच नुकसान होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी ऊस लागवडीस प्राधान्य देत आहेत.

तालुक्यातील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना, जय महेश साखर कारखाना ही तीन साखर कारखाने असल्याने ऊसगाळपही होते आहे.

या तीन साखर कारखान्यांसोबतच तालुका परिसरात गूळ पावडर कारखाना, गूळनिर्मिती कारखाने झाले असल्याने देखील ऊस लागवड वाढत असल्याचे चित्र आहे.

नवीन लागवड १७ हजार ८३१ हे.

खोडवा बारा हजार १४५ हे.

एकूण २९ हजार ९७६ हेक्टर.

गाळपास उपलब्ध होणारा अंदाजित ऊस २२ लाख ४८ हजार २०० मे. टन.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com