Rabi Sowing : रब्बीत ४३ हजार हेक्‍टरवर नावीन्यपूर्ण पिकांची लागवड

‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत रब्बी हंगामात नावीन्यपूर्ण पीकपद्धतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे. खरबूज, लसूण, रब्बी, तसेच हुरडा, ज्वारी यांसारख्या पिकांचा त्यामध्ये समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
Rabbi  Season
Rabbi SeasonAgrowon

अमरावती ः ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत रब्बी हंगामात (Rabbi Season) नावीन्यपूर्ण पीकपद्धतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे. खरबूज, लसूण, रब्बी, तसेच हुरडा, ज्वारी यांसारख्या पिकांचा त्यामध्ये समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून (Department Of Agriculture) देण्यात आली.

Rabbi  Season
Rabbi Crop : रब्बी पिकाला बसणार फटका

विदर्भात सर्वदूर खरीप आणि रब्बी हंगामाचा पीक पॅटर्न आहे. खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग यांसारखी पिके शेतकरी घेतात. त्यानंतर रब्बी हंगामात उपलब्ध ओलाव्याच्या बळावर गहू, हरभरा यांसारखी पिके घेण्यावर त्यांचा भर राहतो. गेल्या दोन वर्षांपासून कृषी विभागाने राज्यस्तरावर ‘विकेल ते पिकेल’ धोरणाचा अंगीकार केला आहे. त्याअंतर्गत नावीन्यपूर्ण तथा बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.

अमरावती विभागात अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाच जिल्ह्यांत कृषी विभागाने गेल्या वर्षी करडई, जवस, तीळ, मोहरी, खपली गहू, रब्बी-हुरडा ज्वारी, टरबूज-खरबूज, लसूण, रब्बी कांदा उन्हाळी तीळ, उन्हाळी मूग, सूर्यफूल या पिकांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Rabbi  Season
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

२०२१-२२ या वर्षात १६१२८ हेक्‍टर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण पिकांची लागवड करण्यात आली होती. यंदा हे क्षेत्र ४३१०० हेक्‍टरवर नेण्याचा कृषी विभागाचा मनोदय आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. नावीन्यपूर्ण पिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे. एका अर्थाने बाजारपेठेत या शेतमालाला मागणी राहते असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षीचे पिकाखालील क्षेत्र लक्षात घेता यंदा संबंधित शेतीमालाची बाजारपेठ लक्षात घेऊन त्याचा विस्तार केला जाईल.

- किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

पीक गतवर्षीची पेरणी (चौकटीत यंदाचे प्रस्तावित क्षेत्र)

करडई २१४४ (३१०५)

जवस २१७ (४४५)

तीळ १३४ (१२९०)

खपली गहू १२८ (५५०)

रब्बी ज्वारी २२५१ (२३६०

टरबूज ४९३ (१०६०)

खरबूज ६५ (३६५)

लसूण ६४ (१६५)

रब्बी कांदा ३०२३ (१२०३५)

उन्हाळी तीळ ३० (५५)

उन्हाळी मूग ६२६० (२०२७०)

सूर्यफूल ० (१४०)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com