Kolhapur Crop Insurance News : कोल्हापुरातील शेतकऱ्यांना पीक विमा सर्व्हर डाऊनचा मोठा फटका

Pik Vima : ऊस हे नगदी पीक असल्याने सरकारकडून या पिकास पीक विमा लागू केला नाही.
Kolhapur Crop Insurance News
Kolhapur Crop Insurance Newsagrowon
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या कित्येक वर्षांपासून पीक विम्याबाबत जनजागृती केली जायची परंतु जिह्यातील शेतकरी पीक विम्याकडे शक्यतो पाठ फिरवायचे. दरम्यान मागच्या ५ वर्षांतील आलेला महापूर आणि अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी पीक विमा उतरण्याकडे वळू लागला आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरम्यान ऊस हे नगदी पीक असल्याने सरकारकडून या पिकास पीक विमा लागू केला नाही. मुळात जिल्ह्यात उसाव्यतीरिक्त अन्य पिकाचे क्षेत्र कमी असल्याने पीक विम्याची जास्त गरज भासली नाही.

परंतु मागच्या काही वर्षांत जिल्ह्यात खरीप पिकांवर पावसाचा मोठा परिणाम झाल्याने शेतकरी भात, सोयाबीन, नाचणी, ज्वारी या पिकांसाठी विमा उतरवत आहे.

पहिल्या टप्प्यात या योजनेला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, २०१९ आणि २०२१ सलग दोन वर्षे नद्यांना महापूर आले. त्यामध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांकडून पीक विमा उतरण्यासाठी प्रतिसाद मिळू लागला आहे.

Kolhapur Crop Insurance News
Kharif Crop Production : खरीप पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व्यवस्थापन महत्त्वाचे

सर्व्हर डाऊनचा मोठा गोंधळ

सध्या दिवसातून बराचवेळ सर्व्हर डाऊन होत असतानाही शेतकरी पीक विमा भरण्यासाठी केंद्राकडे येत आहेत. जिल्ह्यातील सुमारे १३ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप ३ बाकी असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

विमा कंपनीचे सौजन्य

गेल्या सुमारे ५ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता. यावर्षी बुधवार अखेर १३ हजारांवर शेतकऱ्यांनी विम्याचे प्रस्ताव दाखल केले. सर्व्हर डाऊनच्या प्रकारामुळे शेतकरी हैराण होत आहेत, पण विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सौजन्य दाखवत शेतकऱ्यांनी अर्ज भरून घेऊन स्वतः ज्या ज्यावेळी सर्व्हरवर ओपन होईल, त्यावेळी हे अर्ज अपलोड केले जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com