Crop Damage : अस्मानी संकटात पिकांची नासाडी

वादळी वारे, जोरदार पाऊस आणि गारपिटीने राज्याच्या विविध भागांना तडाखा दिला आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागांत तुफान गारपीट झाली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Unseasonal Rain News पुणे : वादळी वारे, जोरदार पाऊस आणि गारपिटीने (Hailstorm) राज्याच्या विविध भागांना तडाखा दिला आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही भागांत तुफान गारपीट (Marathawada Hailstorm News) झाली.

या अस्मानी संकटात रब्बी पिके (Rabi Crop), फळबागा, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी (Crop Damage) झाली. या पावसाने पिके जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

नांदेड जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तुफान वादळ वाऱ्यासह गारपिटीमुळे केळी बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यासोबतच रब्बी पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वीज पडून नागरिक जखमी झाले, तर जनावरेही दगावले आहेत.

मुदखेड तालुक्यातील बारड, निवघा, पाटनूर, खांबाळा, जावरा मुरार, चोरंबा, नागेली, पाथरड, बोरगाव, नांद्री, मुगट, आमदुरा, शंखतीर्थ, चीत गिरी, शेंबोली, पांढरवाडी, वैजापूर, पार्डी, गोबरा तांडा, तिरकसवाडी आदी गावांसह परिसरात गारपिटीने नुकसान झाले.

पावसादरम्यान गारांचा मारा सुरू झाल्याने रब्यातील गहू, हरभरा पिकाचा चिखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावल्याने मोठे संकट उभे राहिले आहे.

या अस्मानी संकटात वेलवर्गीय पीक टरबूज, खरबूज, काकडीसह टमाटर स्ट्रॉबेरी आदी पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. वादळाचा तडाखा चिकू, आंबा, संत्रा, मोसंबी या फळपिकांना बसला. झाडाखाली फळांचा सडा पडला होता.

Crop Damage
Crop Damage : वातावरण बदलाचा बागायतदारांना फटका

मराठवाड्यात दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक गारपीटही झाली.

नैसर्गिक आपत्तीच्या या संकटाने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मराठवाड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे.

बीड जिल्ह्यातील पाटोदा व गेवराई तालुक्यांत पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. पावसांसोबत गारांचाही तडाखा बसल्याने टरबूज, गहू, ज्वारी, फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मंठा तालुक्यातील तळणी येथे गुरुवारी दुपारी गारपीट झाली.

Crop Damage
Unseasonal Rains: हिरवे स्वप्न एका रात्रीत भंगले; जयसिंगपुरात ज्वारी पीक आडवे

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडलांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस झाला. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसात ज्वारी, गहू, हरभरा, कापूस आदी पिके भिजल्याने मालाच्या दर्जावर परिणाम झाला आहे.

उखळी (ता. सोनपेठ) येथील एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आंब्याच्या कैऱ्या, संत्रा गळून पडले आहे. पेरू, टरबूज, खरबूज, टोमॅटोसह पालेभाज्या पिकांचे नुकसान झाले आहे.

खानदेशात बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे.

पावसाच्या हजेरीमुळे जळगाव, चोपडा, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य व्यापाऱ्यांना इतरत्र हलवावे लागले. शुक्रवारी (ता. १७) देखील सकाळी ढगाळ व पावसाळी वातावरण होते. काही भागांत तुरळक पाऊसही झाला. काढणी, मळणीची कामे ठप्प आहेत.

Crop Damage
Crop Damage : पंजाब, हरयाणात वादळी वारे, पावसामुळे गहू पीक भुईसपाट

पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, बारामती, दौंड, वेल्हे, इंदापूर, पुरंदर, भोर या तालुक्यांत झालेल्या वादळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

या तालुक्यांतील काही जणांचा काढणीला आलेला गहू, हरभरा बुधवारी (ता. १५), गुरुवारी (ता. १६) दोन दिवस झालेल्या पावसात भिजला. रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणाने तरकारी पालेभाज्यांवर देखील रोगांचे संक्रमण होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे काढणीस आलेली गव्हाची पिके तसेच चारा पिके जमीनदोस्त झाली आहेत. सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा व मका ही पिके उभी आहेत. तर गहू, हरभरा या पिकांसह काही ठिकाणी कांदा पिकाची काढणी सुरू आहे.

नगर जिल्ह्यातील अनेक भागांत गुरुवारी (ता. १६) वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आंबा, द्राक्ष, संत्री-मोसंबी या फळ बागांचे नुकसान झाले. श्रीरामपूर, राहुरीच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली.

दक्षिण भागातील नगर तालुका, जामखेड, श्रीगोंदे, पारनेर आणि अहमदनगर शहरात सायंकाळी पाचपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

सातारा जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) काही ठिकाणी हलका पाऊस झाला. दुपारपासून ढगाळ वातावरण होऊन पावसास सुरुवात झाली. बुधवारच्या (ता. १५) तुलनेत गुरुवारी पावसाचे प्रमाण कमी होते.

पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान सुरू आहे. फळ पिकांना या पावसाचा फटका बसणार आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळी धुके पडले होते. त्यानंतर दुपारपर्यंत बहुतांश भागात ढगाळ वातावरण झाले होते.़

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com