Crop Damage : सांगली जिल्ह्यासह विविध भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Unseasonal Rain : विटा, खानापूर, भिवघाट परिसरात रविवारी (ता. ७) पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अंकलखोप परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Sangli Crop Damage News : मिरजेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी (ता. ७) सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. पलूस तालुक्यासह विविध भागांत वादळी वाऱ्यामुळे (Stormy Rain) ऊस पिकाचे नुकसान (Crop Damage) झाले असून, रोपवाटिकेत पाणी साठले आहे.

कडेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून, शेड पत्रे उडाल्याने १३ मजूर जखमी झाले. शेडचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

विटा, खानापूर, भिवघाट परिसरात रविवारी (ता. ७) पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अंकलखोप परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. मिरजेच्या पश्‍चिम भागात तुंगसह ठिकठिकाणी पाऊस झाला. पलूस तालुक्यातील अंकलखोप, आंधळी, सावंतपूर, आमणापूरसह सर्वत्र विजांच्या कडकडाटांसह पाऊस सुरू झाला.

Crop Damage
Crop Damage : सततच्या पावसामुळे पिकांची नासाडी थांबेना

जत तालुक्यातील माडग्याळ परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजता जोरदार पावसाने झोडपून काढले. सलग एक तास पाऊस पडत होता.

शेतीचे बांध भरले होते. कडेगाव शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तासभर हजेरी लावली. शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील शेतकरी उन्हाळी पावसाच्या प्रतीक्षेत होते.

दुपारी चारनंतर विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पावसाला सुरुवात झाली. कडेगावसह वांगी, नेर्ली, खंबाळे, औंध, अपशिंगे, कडेगाव, कडेपूर, सोहोली, चिखली, अमरापूर, तडसर आदी गावांत मध्यम ते मुसळधार पावसाने तासभर हजेरी लावली.

Crop Damage
Crop Damage : वादळी पावसामुळे संत्रापट्टयात नुकसान

हा पाऊस ऊस पिकांना लाभदायक ठरला असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. वादळी वाऱ्याने शहरातील संजय चंद्रकांत पालकर यांच्या शेडवरील पत्रे उडाले. त्या शेडमध्ये ७२ शेतमजूर राहत होते.

पत्रे अंगावर कोसळल्याने १३ शेतमजूर जखमी झाले. कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. तर, शेडचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांतून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com