Crop Damage Khandesh : खानदेशात पावसाने नुकसान सुरूच

मागील दोन दिवस खानदेशात सुसाट किंवा वेगाचा वारा, मध्यम ते हलका पाऊस, अशी स्थिती आहे. शुक्रवारी (ता. ७) कुठेही गारपीट किंवा अतिजोरदार पाऊस झाला नाही.
Crop Damage Khandesh
Crop Damage KhandeshAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News मागील दोन दिवस खानदेशात सुसाट किंवा वेगाचा वारा, मध्यम ते हलका पाऊस, (Rainfall) अशी स्थिती आहे. शुक्रवारी (ता. ७) कुठेही गारपीट (Hailstorm) किंवा अतिजोरदार पाऊस झाला नाही. परंतु सुसाट वाऱ्याने मका, ज्वारी, सूर्यफूल, बाजरी आदी पिके (Crop Damage) आडवी होत आहेत.

पावसाळी वातावरण शुक्रवारी दिवसभर कायम होते. दिवसभर ऊन, वारा, अशी स्थिती होती. सायंकाळी अनेक भागात हलका पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, जळगाव, एरंडोल आदी भागात सुसाट वारा व हलका पाऊस झाला.

Crop Damage Khandesh
Crop Damage Compensation : सरसकट मदतीला चाप?

अनेक भागात वृक्षही उन्मळले. धुळ्यातील धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर भागातही सुसाट वारा, हलका पाऊस अशी स्थिती होती. शनिवारी (ता.८) देखील सकाळपासून पावसाळी वातावरण कायम होते.

मध्येच वाऱ्याचा वेग वाढत होता. यामुळे शेती कामे ठप्प झाल्याची स्थिती आहे. शेतकरी चिंतेत आहेत. कारण पिके आडवी होत आहेत. त्यांची कापणी, मळणी आदी कामे लांबत आहेत. तसेच आडवी झालेली पिके कापणीसाठी अधिकची मजुरी द्यावी लागते.

Crop Damage Khandesh
Unseasonal Rain Crop Damage : अस्मानी संकटापुढे शेतकरी हतबल

केळी, पपई व कलिंगडाची काढणी काही शेतकरी खराब वातावरणातही करून घेत आहेत. यामुळे दर मात्र कमी मिळत आहेत.

कारण नुकसानीच्या भितीने शेतकरी खरेदीदारांशी संपर्क करीत आहेत. याचा गैरफायदा खरेदीदार घेत आहेत. कलिंगड, खरबूज आदींचे दर आठ रुपये प्रतिकिलोपर्यंतच आहेत.

मध्यंतरी दरात सुधारणा झाली होती. परंतु वातावरण खराब झाल्याने दर पुन्हा कमी झाले आहेत. तसेच पपईची काढणीदेखील वेगात सुरू आहे. पाऊस आल्यास अधिकचे नुकसान होईल.

पिंपळनेर येथे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..

धुळ्यात साक्री तालुक्यातील पिंपळनेर, कुडाशी, देशशिरवाडे, जेबापूरसह परिसरात अवकाळी पाऊस झाला. त्यात कांदा व भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त झाली. पिंपळनेर शहरात दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली.

तब्बल पावणेदोन तास पाऊस बरसत राहिला, तसेच कुडाशी, देशशिरवाडे, जेबापूरसह परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने कांद्याचे मोठे व भाजीपाल्याचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे.

गेल्या महिन्यात ६ मार्चला अवकाळी पाऊस बरसला होता. आता पुन्हा महिनाभरात दुसऱ्यांदा जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com