Grape Farming : हवामान बदलामुळे द्राक्ष शेतीवर संकट

Godrej Agrovet : ‘गोदरेज अॅग्रोव्हेट’ आयोजित चर्चासत्रातील सूर
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Climate Changes Affecting Grape Farming : मुंबई : ‘‘हवामान बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. वर्षभर पडणारा पाऊस हा द्राक्षांच्या मुळावर उठत आहे. अशा काळामध्ये शेतकऱ्यांनी फवारणीसाठी वापरली जाणारी रसायने आणि अन्य बाबी तपासूनच घेतल्या पाहिजेत.

प्रमाणित कंपन्यांची उत्पादने वापरल्यास एकाच वेळी दोन ते तीन प्रकारची औषधे फवारण्याची पद्धत बंद होणार नाही,’’ असा सूर ‘गोदरेज ॲग्रोवेट’च्या वतीने कम्बाईन या आपल्या बायो स्टीम्युलंटला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विक्रोळी (मुंबई) येथे शुक्रवारी (ता.२४) आयोजित ‘द्राक्ष उत्पादकांसमोरील आव्हाने’ या चर्चासत्रात उमटला.

या चर्चासत्रात शेतकरी आणि वितरकांनी सहभाग घेतला. या वेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. एस. डी. रामटेके, द्राक्ष निर्यातदार शेतकरी प्रभाकर मोरे, गोदरेज ॲग्रोव्हेट चे पीक उत्पादन व्यवसाय सीईओ राजा वेल्लू यांनी चर्चासत्रात भाग घेतला. तत्पूर्वी गोदरेज ॲग्रोवेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंग यादव यांनी ‘कम्बाइन’ बाबत माहिती दिली.

चर्चासत्रामध्ये बोलताना निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रभाकर मोरे म्हणाले, की सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलाशी संघर्ष करावा लागत आहे. गेल्या काही काळापासून अनियमित वर्षभर येणाऱ्या पावसामुळे द्राक्षापिकाला फटका बसतो.

हवामान केंद्रांकडून उपलब्ध माहितीच्या आधारावर नियोजन करण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. रसायनाच्या वापराबाबत अधिक सजग राहण्याची आवश्यकता असून, चुकीच्या आणि बोगस कीडनाशकांचा निर्यातक्षम द्राक्षशेतीला मोठा फटका बसू शकतो.

Grape Farming
Grape Crop Damage : तापमानातील बदलामुळे द्राक्ष हंगामावर संकट

डाॅ. एस. डी. रामटेके म्हणाले, की पाऊस पडल्यानंतर फवारणी करण्याची शेतकरी गडबड करतात. त्याऐवजी योग्य वातावरणात फवारणी केल्यास त्याचे शोषण होते. केवळ कृषी सेवा केंद्र चालकांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः शास्त्रीय माहिती घेतली पाहिजे. विनाकारण एकापेक्षा अधिक रसायने एकत्र करून फवारणे टाळावे.

सध्या केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिल्यामुळे बोगस कंपन्यांना काहीसा आळा बसला असला तरी शेतकऱ्यांनी जागरूक राहिले पाहिजे. खरेदीची पक्की बिले घेतल्यास भविष्यात उद्‍भविलेल्या तक्रारीबाबत नुकसान भरपाईची मागणी करता येते.

Grape Farming
हवामान बदलामुळे दुष्काळाचे संकट गंभीर

‘ॲग्रोव्हेट’च्या ‘कम्बाइन’ या उत्पादनातला गेल्या २५ वर्षांत शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ७० टक्क्यांहून अधिक निर्यातक्षम द्राक्षांतील साखर आणि अन्य घटकांचे योग्य संतुलन राखत त्यांचा आकार वाढवण्याचे काम या उत्पादनाने केले असल्याचा दावा ‘गोदरेज’चे राजा विलो यांनी केला.
या वेळी कंपनीचे ‘क्राॅप प्रोडक्शन बिजनेस’चे कार्यकारी संचालक बुर्जिस गोदरेज, ‘कार्पोरेट कम्युनिकेशन’चे प्रमुख सुजित पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी, वितरक आणि शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com