Hapus Mango : वाढत्या तापमानाचे देवगड हापूसवर संकट

सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. सध्या जिल्ह्यात रात्री उशिरा गारवा, तर दिवसभर प्रचंड उष्णता असे चित्र आहे.
Devgad Hapus
Devgad HapusAgrowon
Published on
Updated on

Devgad Hapus Mango सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून अचानक वाढलेल्या तापमानाचा (Temperature) देवगड हापूस आंब्यावर (Devgad Hapus Mango) परिणाम जाणवू लागला आहे. काही ठिकाणी फळे बाधित होत आहेत. कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची (Mango Farmer) चिंता वाढली आहे.

Devgad Hapus
Hapus Mango : पहिल्या टप्प्यात अवघे दहा टक्केच हापूसचे उत्पादन

सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. सध्या जिल्ह्यात रात्री उशिरा गारवा, तर दिवसभर प्रचंड उष्णता असे चित्र आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांत तर जिल्ह्याच्या बहुतांश भागातील तापमान ३७ अंशांपेक्षा अधिक वाढले आहे. या वाढलेल्या तापमानाचा फटका आंबा आणि काजू पिकांना बसण्यास सुरुवात झाली आहे.

Devgad Hapus
Devgad Hapus Mango : देवगड हापूस आंबा मुंबईत दाखल

आंबा पिकांवर काही ठिकाणी फळे बाधित होण्यास सुरुवात झाली आहे. आंब्याला काळे डागदेखील पडत आहेत. या शिवाय थ्रीप्स, तुडतुड्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या वर्षी पहिल्या टप्प्यात अत्यल्प झाडांना मोहोर आला होता. परंतु दुसऱ्या टप्प्यात थंडीमुळे चांगला मोहोर आला. या मोहोराला सध्या फळधारणा होत आहे. वाढलेल्या उष्णतेचा या फळांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. तापमान ३७ अंशांपर्यंत गेल्यामुळे काही ठिकाणी आंब्याची फळे उष्णतेने भाजल्यासारखी दिसत आहेत. अनेक बागांना आपण भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांकडून अशा स्वरूपाचे परिणाम सांगितले जात आहेत. पुढच्या आठवड्यात तापमान कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

- डॉ. विजय दामोदर, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्‍वर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

वाढलेल्या उष्णतेपासून आंबा फळाचे संरक्षण करणे अवघड जात आहे. संरक्षण करण्यासाठी पिशव्यांचे आवरण घालणे हाच उपाय असतो. परंतु तो उंच झाडे आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या फळांना आवरण घालणे शक्य नाही. या वातावरणाचा उत्पादनावर परिणाम होईल.

- तेजस मुळम, आंबा बागायतदार, देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com