
Cotton Production : पुणे ः एकीकडे शेतकरी नव्या हंगामातील कापूस लागवडीच्या कामात गुंतले असताना दुसरीकडे कापूस भाव हंगामातील नीचांकी पातळीवर होते. ‘ऑफ सिझन’मध्येही भाव कमी होते. तरीही कापूस लागवड ११७ लाख हेक्टरवर पोचली आहे. गेल्यावर्षीपेक्षा केवळ एक टक्क्याने पिछाडीवर आहे. कापूस भावात मागील आठवडाभरात काहीशी सुधारणा झालेली दिसते.
शेतकऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून ७ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त भाव दिसला नाही. सरासरी भावपातळी ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहिली. कापूस विकायचा पण भाव वाढत नसल्याने शेतकरी हतबल झाले. परिणामी कमी भावातही कापूस विक्री वाढली. कापसाच्या भावात वाढ होईल या आशेने काही शेतकरी आतापर्यंतही थांबले आहेत. पण सध्या शेतकऱ्यांकडील कापसाचे प्रमाण कमी आहे.
ऐन लागवडीच्या काळात कापूस भाव दबावात आले. त्यामुळे शेतकरी यंदा कापूस लागवडीकडे पाठ फिरवतात की काय, अशी शक्यता होती. पण जूनमध्ये पावसाने दडी दिली आणि पेरणीची समीकरणे बदलली. पाऊस उशिरा आल्याने शेतकरी पारंपरिक पिकांकडेच वळालेले दिसतात. त्यात कापसालाही पसंती मिळाली. मागील हंगामात याच काळातील लागवड ११८ लाख हेक्टरवर होती. म्हणजेच यंदा जवळपास गेल्यावर्षीऐवढी लागवड झाली आहे.
आठवड्यात दरात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा
देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सरत्या आठवड्यात कापूस दरात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. कापूस वायद्यांमध्येही वाढ झाली. वायदे आठवडाभरात कमी जास्त होत राहिले. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही भावात चढ-उतार होते. देशातील कापूस वायदे शुक्रवारी (ता.२८) ५८ हजार ८६० रुपयांवर बंद झाले. तर बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळाला. ऑगस्टमध्ये कापसाला चांगला उठाव राहू शकतो, असा अंदाजही अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.