
परभणीः परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. ८) पर्यंत ४ लाख २८ हजार ७५० हेक्टरवर (८३ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रामध्ये कपाशीची १ लाख ६७ हजार २२१ हेक्टरवर (९० टक्के) लागवड झाली तर सोयाबीन २ लाख ९ हजार ८५८ हेक्टरवर (९६ टक्के) पेरणी झाली आहे.
परभणी (Parbhani) जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ५ लाख १७ हजार १४३ हेक्टर असून शुक्रवार (ता. ८) पर्यंत सोयाबीनची २ लाख १९ हजार २०२ पैकी २ लाख ९ हजार ८५८ हेक्टर (९६ टक्के) पेरणी झाली.
कपाशीची (Cotton) १ लाख ८५ हजार ७२० पैकी १ लाख ६७ हजार २२१ हेक्टर (९० टक्के) लागवड झाली. तुरीची ५० हजार ६०८ पैकी ३४ हजार २२५ हेक्टर (६८ टक्के), मुगाची ३३ हजार ९९९ पैकी ११ हजार ३४२ हेक्टर (३३ टक्के), उडदाची ११ हजार ६१२ पैकी ३ हजार ३८७ हेक्टर (२९ टक्के) पेरणी झाली आहे. (Cotton Cultivation News)
एकूण कडधान्यांची (Pulses) ९६ हजार ७१३ पैकी ४८ हजार ९७५ हेक्टरवर (५१टक्के) पेरणी झाली आहे. ज्वारीची ९ हजार ९५९ पैकी १ हजार९६३ हेक्टर (२० टक्के), बाजरीची १ हजार ७०१ पैकी १४३ हेक्टर (८ टक्के), मक्याची १ हजार २२४ पैकी ४५५ हेक्टर (३७ टक्के) पेरणी झाली.
एकूण तृणधान्यांची (Cereals) १४ हजार १५७ पैकी २ हजार ६२६ हेक्टर (१९ टक्के) पेरणी झाली. जिंतूर तालुक्यात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाली आहे. अन्य आठ तालुक्यातील पेरणीक्षेत्र सरासरी क्षेत्रापेक्षा कमी आहे.
तालुका निहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका...सरासरी क्षेत्र...पेरणी क्षेत्र...टक्केवारी
परभणी...९६४९१२...७५५६०...७८
जिंतूर...८४२०३...९१९३०...१०९
सेलू...५७९६२...५४८३९...९५
मानवत...४१६५३...२६७९७...६४
पाथरी...४५९१६...२९८३२...६५
सोनपेठ...३४७५५...३००८५...८७
गंगाखेड...५४६६१...४९५९६...९१
पालम....४६०४२...४००८१...८७
पूर्णा...५५४५८...३००३०...५४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.