Cotton Bollworm : तळेगाव डवला येथे कपाशीवर आली बोंड अळी

Cotton Pest Control : तेल्हारा तालुक्यातील तळेगाव डवला व परिसरात कपाशी पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे.
Cotton
CottonAgrowon

Akola News : तेल्हारा तालुक्यातील तळेगाव डवला व परिसरात कपाशी पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे. अळीने परिपक्व झालेल्या बोंडावर हल्ला चढवल्याने नुकसान होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Cotton
Cotton Bollworm Control : बोंडअळी ला रोखण्यासाठी फवारणीशिवाय कोणते उपाय आहेत?

या भागात जून महिन्यात कपाशीची लागवड करण्यात आली होती. आता हे बोंड परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. अशातच पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झालेला आहे. पहिल्यांदा लागलेली बोंडे ही कापूस उत्पादनासाठी महत्त्वाची असतात.

Cotton
Cotton Bollworm : कपाशीवरील गुलाबी अळी व्यवस्थापन

यातून दर्जेदार कापूस मिळत असतो. याच बोंडांना अळी पोखरत असल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. शेतकऱ्यांनी बीटी बियाणे लावलेले आहे. मात्र, यावरही अळी आक्रमकपणे वाढत चालली आहे.

मागील काही वर्षे अळीचा प्रादुर्भाव कमी होता. यंदा मात्र, सुरुवातीपासून अळीची लक्षणे दिसू लागली होती. आता झाडांवर लागलेली बोंडे अळी फस्त करीत आहे.

मी पाच एकरांत जूनच्या पहिल्या आठवड्यात कपाशीची लागवड केली होती. आता झाडांवर लागलेल्या ५० टक्के बोंडावर अळी आहे. बीटी कपाशीवरही अळी आता येत असल्याने या दृष्टीने संशोधन होऊन बोंडअळीला अटकाव करणारे बियाणे आणण्याची आवश्यकता आहे.
-विजय ताथोड, शेतकरी, तळेगाव डवला, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com