Agriculture Act : कृषी कायद्यात विक्रेत्यांची बाजू जाणून घ्या

Bogus Seed Fertilizer Act : या कायद्यात कृषी विक्रेत्यांच्या महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात याव्यात, अशी मागणी ॲग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली.
Seed
SeedAgrowon
Published on
Updated on

Nashik News : बनावट बियाणे, खते पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बनावट कृषी निविष्ठा उत्पादन व विक्री करणाऱ्या दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाकडून नव्याने तयार होणाऱ्या कायद्याचे, नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशन व कळवण तालुका असोसिएशन तसेच तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते यांच्यातर्फे स्वागत करण्यात येत आहे.

Seed
Food Safety and Standards Act : दुग्ध व्यावसायिकांसाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा

या कायद्यात कृषी विक्रेत्यांच्या महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात याव्यात, अशी मागणी ॲग्रो डीलर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली. याबाबत आमदार नितीन पवार यांना निवेदन देण्यात आले.

शासनाच्या कृषी विभागाने परवानगी दिलेल्या कृषी निविष्ठा उत्पादनाची विक्री करणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत विक्री करण्यात येत असते.

Seed
Bogus Seed Act : बनावट निविष्ठांबाबतची विधेयके संयुक्त समितीकडे

यात कोणत्याही गुणवत्तेशी संबंध नसल्यामुळे होणाऱ्या कायद्यामध्ये वितरक व विक्रेते यांना जबाबदार धरण्यात येऊ नये. बोगस बियाणे, रासायनिक खते उत्पादन करणे व विक्री करणे या बाबत शासन स्तरावरून नवीन कायदा होणार असल्यास असा कायदा मान्य होण्यापूर्वी विक्रेत्यांशी निगडित असलेल्या बाबी कृपया विचारांत घ्याव्यात, नवीन कायद्यामुळे विक्रेत्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री द्यावी, अशा इतर महत्त्वपूर्ण मागण्या या निवेदनात करण्यात आल्या.

यावेळी नाशिक ॲग्रो असोसिएशन संचालक कृष्णा पगार, तालुकाध्यक्ष सुधाकर खैरनार, उद्योगपती बेबीलाल संचेती, राजेंद्र खैरनार, रवींद्र शिरोडे, सुधाकर खैरनार, संदीप अमृतकार, अमित मालपूरे, दीपक येवले, लक्ष्मण सोनजे, राजेंद्र मोरे, प्रवीण वेढणे, नितीन देशमुख, विनोद पाटील, स्वप्नील पगार, उदय मालपुरे, शरद शिरसाठ, कैलास कोठावदे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com